चांदवड शहरातील विविध प्रकल्पांबाबत ना. गडकरींना निवेदन
उदय वायकोळे चांदवड
चांदवड : चांदवड शहरातील विविध विकास कामांबाबत मा.ना श्री.नितीनजी गडकरी( केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री, भारत सरकार) यांना आज खासदार भारतीताई पवार आमदार डॉ राहुल आहेर,प्रथम नगराध्यक्ष श्री भूषण कासलीवाल यांनी दिल्ली येथे भेटून पत्रव्यवहार करण्यात आला .
चांदवड शहरासाठी पर्यटन विकास अंतर्गत खास बाब म्हणून निधी उपलब्ध करणे, चांदवड शहर व चांदवड तालुक्यातील स्थानिक वाहनांना टोल फ्री करण्याबाबत, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत चांदवड शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामातील अडचणी बाबत, मा.प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत चांदवड नगर परिषदेस दुसऱ्या सविस्तर प्रकल्प अहवालास( DPR) मंजुरी मिळणेबाबत तसेच CSR फंड उपलब्ध होणे बाबत या सर्व बाबींविषयी मा.नितीनजी गडकरी यांना निवेदन देण्यात आले असल्याचे स्वीय सहायक यांनी सांगितले






