Chandwad

चांदवडकरांना नगरपरिषदेचे वेध, अनेक तरुणांचे लक्ष भूषण कासलीवालांकडेच

चांदवडकरांना नगरपरिषदेचे वेध, अनेक तरुणांचे लक्ष भूषण कासलीवालांकडेच

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड नगरपरिषद 2021 च्या निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय मतदार याद्या जाहीर झाल्या असून अनेक तरुण इच्छुक उमेदवार प्रथम नगराध्यक्ष श्री भूषण कासलीवाल यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. आज श्री भुषण कासलीवाल हे केंद्रातील एका मंत्र्याच्या भेटीसाठी दिल्ली येथे गेले असल्याचे समजते.
13 फेब्रुवारी 2021 रोजी नाशिक येथे 9 News आयोजित गोदा सन्मान पुरस्कार- 2021 अंतर्गत “आदर्श नगराध्यक्ष” म्हणून श्री भूषण कासलीवाल यांना दैनिक सामनाचे संपादक मा.खा.श्री.संजयजी राऊत, नाशिकचे पालकमंत्री मा.ना.श्री.छगनजी भुजबळ, कृषीमंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
भूषण कासलीवाल यांचे वडील स्व.जयचंदजी कासलीवाल यांनी अत्यंत सामान्य घरातून येऊन जनसेवेचे मोठे कार्य उभे केले. प्रत्येक नागरिकाची व्यथा, समस्या ते जाणून घ्यायचे आणि म्हणून नागरिकांनी त्यांना “देवमाणूस” असे संबोधले.
सध्या भाजप कडून चांदवड नगरपरिषद निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक असल्याने तिकीट आपल्याला कसे मिळेल या फिल्डिंगसाठी अनेक जण तयार आहेत मात्र यावेळी तिकीट वाटप कशी होणार, जुने निष्ठावंत यांना तिकीट मिळणार की नवीनच कोणाला संधी मिळणार हे सस्पेंस लवकरच खुले होईल. वीज तोडणारे राज्यातील जुलमी सरकार :: दिलीप धोत्रे

( प्रतिनिधी)
रफिक अत्तार

राज्याचे ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी विज बिल कमी करू. दुरुस्त करू अशी आश्वासने दिली. मात्र प्रत्यक्षात सामान्यांची वीज तोडणी सुरू आहे. वीज तोडणारे हे राज्यातील जुलमी सरकार आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही आसुड ओडून महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा शाडो सहकार मंत्री दिलीपबापू धोत्रे यांनी दिली. टाळेबंदी नंतर सामान्यांना आलेले भरमसाठ वीजबिल माफ करण्यात यावे. तसेच वीज बिल थकबाकीपोटी वीज तोडण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे. त्यामुळे वीज तोडणी त्वरित थांबवावी अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा शाडो सहकार मंत्री दिलीपबापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात महावितरणच्या कार्यालयासमोर भव्य आसुड मोर्चा काढण्यात आला. यावेळी महावितरणच्या अधिकार्‍यांना निवेदन देखील देण्यात आले. कोरोना सारख्या टाळेबंदीच्या काळामध्ये सामान्यांना मोठ्या प्रमाणावर वीज बिले आली. यानंतर ऊर्जामंत्री यानी वीज बिल माफ करू. तीन टप्प्यांमध्ये वीज बिल भरण्याची सवलत देऊ. अशी घोषणा केली. मात्र ऊर्जा मंत्र्यांची घोषणा फोल ठरली. ऊर्जा मंत्री यांनी महाराष्ट्राला फसवल आहे. कारण सध्या प्रत्यक्षात सामान्यांची वीज तोडणी होत आहे. त्यामुळे महावितरण जनसामान्यांच्या जीवावर उठत असेल तर वीज तोडणीसाठी येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मनसे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी कायदा देखील हातात घेतला जाईल. असा इशारा यावेळी धोत्रे यांनी दिला. तसेच महावितरण कंपनीकडून तात्काळ वीज बिल माफी द्यावी. सामान्यांच्या घरावर वीज तोडणी करण्याची कारवाई देखील त्वरित थांबवावी. अन्यथा मनसे स्टाइल उत्तर दिले जाईल. असेही या निमित्ताने धोत्रे यांनी निवेदनाच्या माध्यमातून कळवले आहे . या आंदोलनाच्या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर , शशिकांत पाटील ,अनिल केदार, भालचंद्र गोडसे ,अक्षय विभुते, अजिंक्य तोडकरी , विशाल गोडसे, खंडू इंगोले ,कृष्णदेव इंगोले , नागेश इंगोले , तेजस गांजले, शुभम काकडे यांच्यासह शेकडो मनसैनिक आणि सामान्य नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button