Rawer

कोरोनाच्या काळातही त्या दोन रेशनिग दुकानदाराना पावतीचे वावडे के-हाळा गावातील रेशन दुकान नं 101 व105 या दुकान दाराचा प्रताप

कोरोनाच्या काळातही त्या दोन रेशनिग दुकानदाराना पावतीचे वावडे के-हाळा गावातील रेशन दुकान नं 101 व105 या दुकान दाराचा प्रताप

भुषण महाजन के-हाळा

रावेर : कोरोनाच्या काळातही के-हाळा गावातील रेशन दुकान नं 101 व दु नं 105 या दुकानदाराना पावतीचे वावडे झाले असुन धान्य देताना कोणालाही पावती देत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत असुन या दुकानदारावर कोणाचाही अकुश नाही जिल्हाधिकारी व तहसीलदारानी लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे …ये पब्लीक है भाई सब जानती है…

संपूर्ण जगाला कोरोना आजाराने हैराण केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणीही उपाशी राहू नये यासाठी प्रशासनाने ता. १ एप्रिलपासून रेशनिंग दुकानातून वाॅर्डनिहाय धान्य वाटप करण्याचा चांगला निर्णय घेतला. मात्र रावेर तालुक्यातील के-हाळा गावांत ग्राहकांना धान्य खरेदीनंतर कसलीच पावती दिली जात नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत असल्याने ग्राहक पुरतेच हैराण झाले आहेत. संबंधित दुकानदार ग्राहकांना धान्य कमी देऊन पैसे मात्र ज्यादा उकळत असल्याची ग्राहकांची तक्रार असून दुकानदारांकडून होणाऱ्या सर्रास लूटमारीवर कोणाचेच कसलेही नियंत्रण नसल्याची प्रचिती ग्राहकांना येत आहे.

संपूर्ण जगाला कोरोना आजाराने हैराण केले आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासन तातडीने विविध निर्णय घेताना दिसत आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर कोणीही उपाशी राहू नये यासाठी प्रशासनाने ता. १ एप्रिलपासून रेशनिंग दुकानातून वाॅर्डनिहाय धान्य वाटप करण्याचा चांगला निर्णय घेतला. मात्र स्वस्त धान्य दुकानातून वारेमाप पैसे कमावण्यात पटाईत असणाऱ्या धान्य दुकानदारांनी ग्राहकाला धान्य वितरणानंतर शासन नियमानुसार पावती देणे बंधनकारक असतानाही ते सध्या नेहमीप्रमाणेच धान्य वितरणानंतर ग्राहकांना कसलीही पावती न देता शासनाची दिशाभूल करुन आपला वरकमाईचा धंदा बिनबोभाटपणे करीत आहेत. के-हाळा गावात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराबाबत कोणी ही बोलायला तयार नाही आवाज महाराष्ट्रात न्युज या बाबत आवाज उठवुन बातम्या प्रसिद्ध केल्या मात्र पुरवठा अधिकारी याच्याकडून कसलीच दखल घेतली जात नसल्याची प्रचिती ग्राहकांना येत आहे. परिणामी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार ग्रामस्थांच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरला आहे.

के-हाळा येथील रेशन दुकान नं 101 व 105 या दुकानदाराचे कारनामे सध्या चर्चेत आहे मात्र सध्या याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन संबंधित दुकानदार गाव पुढाऱ्यांना हाताशी धरून ग्राहकांना शासन नियमाप्रमाणे धान्य वाटप न करता व त्याची कसलीही पावती न देता धान्य कमी देऊन ज्यादा पैसे घेत आहे. तसेच खोटी कारणे सांगून वहीत कोर्‍या पानांवर सह्या घेत आहे, तसेच ग्राहकांशी उध्दटपणे वागून दुकान आवारात दहशत करुन ग्राहकांना दमदाटी करीत आहे, दुकानदाराच्या मनमानी कारभाराला स्थानिक प्रशासनाकडून मिळणारे पाठबळ सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

दरम्यान सध्या ग्राहकांनी संबंधित दुकानदारास धान्याच्या पावती बाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे देऊन पावती देणे टाळले जात असल्याचा प्रकार येथे राजरोसपणे घडत आहे. पावती बाबत विचारणा केलेल्या ग्राहकास दुकानदारासह, साथीदारांकडून उडवा उडवीचे उत्तरे देतात व ग्राहकांची मुस्कटदाबी करुन त्यांना त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या संबंधित दुकानदारावर तहसिल दार व पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे

कारवाईला मिळेना मुहूर्त…

के-हाळा गावातील स्वस्त धान्य दुकानदारावर संबंधितांकडून त्यावर कसलीच कारवाई होत नसल्याने व दुकानदाराची शिरजोरी वाढत चालल्याने ग्राहकांचा प्रशासनावरील विश्वास कमी होत चालला आहे. संबंधित प्रशासनाकडून दुकानदारावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने पुरवठा विभागाचा कारभार संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे गावपुढार्यांसह, प्रशासनाच्या वरदहस्तामुळे या दुकानदाराची शिरजोरी वाढली असून परिणामी ग्रामस्थांची फसवणूक होऊन मोठे आर्थिक नुकसान होत आहे.तरी या दुकानाची लवकरात लवकर चौकशी करून सत्य समोर आनावे अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे ….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button