?️अमळनेर कट्टा…छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपतर्फे ग्रामिण रुग्णालयास मिळाली शवपेटी रात्रभर पडणाऱ्या मृतदेहांची थांबणार अहवेलना ..
अमळनेर : येथील ग्रामिण रुग्णालयात रात्रभर शवविच्छेदन गृहात पडणाऱ्या मृतदेहांची अहवेलना थांबावी म्हणून सामाजिक व सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपने अमळनेर ग्रामिण रुग्णालयास सेवार्थ भेट म्हणून शवपेटी प्रदान केली.
सदर शवपेटी छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमात अमळनेर विभागाच्या प्रांताधिकारी श्रीमती सीमा अहिरे,तत्कालीन मुख्याधिकारी तथा जळगाव महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ विद्या गायकवाड,अमळनेर डीवायएसपी कार्यालयाचे सहा पोलीस निरीक्षक एकनाथराव ढोबळे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रामिण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे व वैद्यकीय अधिकारी डॉ आशिष पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.सुरवातीला अमळनेर न प चे प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी प्रास्तविक केले, सदर शवपेटी देण्यामागचा उद्देश त्यांनी स्पष्ट करून ही शवपेटी कायमस्वरूपी ग्रामिण रुग्णालयात स्थिर राहील असे सांगितले. सदर शवपेटी श्री शिवाजी महाराज गार्डन ग्रुप सदस्यांच्या आर्थिक योगदानातून उपलब्ध केली असून दोन महिन्याआधीच या ग्रुपतर्फे सुमारे 51 हजारांची मदत शहरातील एका फोटोग्राफर च्या वैद्यकीय उपचारासाठी देण्यात आली होती,याशिवाय अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम ग्रुपतर्फे राबविले राबविले जात असतात.प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी मनोगतात ग्रुपच्या कार्याचे विशेष कौतुक करताना या ग्रुपमध्ये सर्व जाती धर्मातील आणि सर्व क्षेत्रातील एवढेच नव्हे तर सर्वसामान्य कुटुंबापासून व्यक्तींपासून अतिशय मोठ्या कुटुंबातील महिला व पुरुष बांधवांचा समावेश असल्याने हा ग्रुप अमळनेरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आदर्श असून सामाजिक एकात्मतेचे हे खरे प्रतिक आहे,हे एकतेचे प्रतीक असेच टिकवून ठेऊन सामाजिक व सांस्कृतिक कार्याची चळवळ कायम सुरू ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.तर डॉ विद्या गायकवाड यांनी देखील ग्रुपचे कौतुक केले.
शवपेटी होती अत्यंत गरजेची-डॉ ताडे
ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रकाश ताडे म्हणाले की अमळनेर ग्रामीण रुग्णालयात अपघातग्रस्त अथवा इतर कारणाने मयत झालेले मृतदेह रात्रीबेरात्री आल्यास शवविच्छेदनासाठी ते रात्रभर शवविच्छेदन गृहात टेबलावर पडून राहत होते,प्रत्यक्षात शासकीय अनुदानात शवपेटी ची तरतूद नसल्याने कुणीतरी दातृत्व दाखवेल अशी अपेक्षा आम्हाला होती,अखेर आम्ही सर्व डॉक्टर्स आणि स्टाफ मिळून ही व्यवस्था करणार होतो मात्र श्री शिवाजी महाराज गार्डन ग्रुपने ही अनमोल भेट देऊन मृतदेहांची मोठी सोय केली असून सदर शवपेटी कायमस्वरूपी शवविच्छेदन गृहात अन्य खोलीत फिक्स केली जाईल,कुणालाही ती बाहेर दिली जाणार नाही आणि पेटीची देखभाल दुरुस्ती देखील काळजीपूर्वक ठेवली जाईल असे सांगून सदर ग्रुप सदस्यांचे विशेष आभार त्यांनी व्यक्त केले.शेवटी आभार देविदास देसले यांनी मानले.
दरम्यान या ग्रुपमध्ये सुमारे सुमारे तीनशे ते साडेतीनशे महिला व पुरुष सदस्य असून ग्रुपमध्ये सदस्य होण्यासाठी केवळ शिवाजी उद्यानात सकाळी पायी चालण्यासाठी अथवा शारीरिक व्यायामासाठी येणे आणि ग्रुपच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होणे एवढीच अट आहे,विशेष म्हणजे ग्रुपची कोणतीही मासिक फी देखील नाही हे देखील विशेष असून तरी देखील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस एकत्रित येऊन साजरा करणे,दर दोन महिन्यांनी स्नेह मेळा घेणे,गार्डन ची निगा राखणे, हे ग्रुपचे वैशिट्य आहे.
या कार्यक्रमास संजय चौधरी,चेतन राजपूत,सौ उज्वला शिरोडे व अरुण पाटील,डॉ संजय शाह,डॉ सौ अंजली चव्हाण,डॉ शरद बाविस्कर, डॉ सौ हिरा बाविस्कर,पर्यंक पटेल,प्रविण पारेख,प्रेम शाह,अँड एस एस ब्रह्मे,सुनील छाजेड,महेश देशमुख,सोमचंद संदानशिव,प्रकाशचंद्र पारेख,मकसूद बोहरी,सिद्धार्थ सोनवणे,जयदीप पवार,वीरेंद्र दोढिवाला,देविदास देसले,संदीप थोरात,तेजु जामखेडकर,बिपीन पाटील,राजू सिंधी, प्रकाश सोनार,शरद शेवाळे,मुकेश पाटील,वीरेंद्र सेठ सिंधी,संतोष वाघ,अप्पा पाटील,सौ अर्चना वर्मा,सौ संगीता आठवले,सौ मीना आठवले,सौ वैशाली शेवाळे,सौ अनिता जामखेडकर,सौ सोनवणे,सौ ढोबळे,सौ रुपाली संगीले,सौ वर्षा चव्हाण, मंगलाबाई पाटील,सौ नूतन पाटील,समीना बोहरी,खडीजा बोहरी,सखींना बोहरी,फरीदा बोहरी,यासह श्री शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे महिला व पुरुष सदस्य उपस्थित होते.







