त्या मुख्यध्यापकाने उडवला माहिती अधिकाराचा फज्जा
मुबारक तडवी रावेर
रावेर : रावेर तालुक्याच्या के-हाळा येथील दत्तु सोनजी पाटील माध्यमिक व आदर्श माध्यमिक विद्यालयालयात रितसर माहिती अधिकार अर्ज करून ही मा.मुख्यध्यापक यानी उडवाउडवीचे उत्तर देऊन माहिती अधिकाराचा फज्जा उडवला आहे…
भ्रष्टाचाराची प्रकरणे उजागर करण्याकरिता माहिती अधिकारातून माहिती मागण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झाला.अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत माहिती देणे अनिवार्य असतानाही मा. मुख्यध्यापक यांनी अर्जदाराला दिशाभुल करणारे पत्र पाठवून माहिती अधिकाराची अवेहलना केली आहे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी
माहिती अधिकार कायद्यासाठी तीव्र लढा दिला.शासनस्तरावरून माहिती अधिकाराचा कायदा करण्यास भाग पाडले आणि माहिती अधिकाराचा कायदा २००५ मध्ये अंमलात आला.परंतु अनेक प्रशासकीय अधिकारी आपले पितळ उघडे पडू नये म्हणून माहिती दडविण्याचा प्रयत्न करतात.याचाच प्रत्यय नुकताच के-हाळा येथील दत्तु सोनजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आला आहे






