Mumbai

?Breaking… MUMBAI BMC SCAM …मुंबई महानगरपालिकेत ‘ चर ‘घोटाळा

? MUMBAI BMC SCAM …मुंबई महानगरपालिकेत ‘ चर ‘घोटाळा

मुंबई: मुंबईत बेकायदा बांधकामे, बेकायदा वायर्स असे प्रकार सर्रास होत असतात पण आज बेकायदा चर खोदला जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. भायखळ्यातील नव्याने दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यांवर हे खोदकाम फोर जी कनेक्शनसाठी हे खोदकाम सुरु होते. यातून महानगर पालिकेला कोट्यवधी रुपयांच्या महसूलावर मुकावेच लागते. त्याचबरोबर रस्त्यांच्या दर्जाही खराब होतो. असे दुहेरी नुकसान महापालिकेला सहन करावे लागत असून त्याचा त्रास नागरिकांनाही होत आहे.

भायखळा येथील शेख हफीमुद्दीन मार्गावर हे चर खोदले जात होते. याबाबत महानगर पालिकेच्या ई प्रभागाकडून माहिती घेतल्यास या खोदकामाला परवानगी देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले, असा आरोप समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला.
हा प्रकार फक्त भायखळ्या पुरता मर्यादित नाही. तर संपूर्ण मुंबईत हा प्रकार सुरु असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. कोविड काळात हे प्रकारही वाढले असल्याचे त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्यांव्दारे सांगितले.
महानगर पालिका नव्याने दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यावर चर खोदण्याची परवानगी शक्यतो देत नाही. जर अत्यावश्‍यक कामासाठी तिप्पट शुल्क आकारून ही परवानगी दिली जाते. ज्या ठिकाणी हे चर खोदले जात होते. तो रस्ता हमी कालावधीत असल्याचा दावाही शेख यांनी केला. हा घोटाळा असून यातून पालिकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागतेच. त्याच बरोबर रस्त्यांचा दर्जाही घसरत आहे. त्यामुळे याबाबत ठोस कारवाई करण्याचे गरजेचे असल्याचेही त्यांनी हरकतीच्या मुद्दाव्दारे नमूद केले.

चर खोदण्यासाठी महापालिका प्रत्येक मिटरला 3500 ते 8 हजार रुपयांपर्यतचे शुल्क वसूल करते. वर्षाला सुमारे 400 किलोमीटर लांबीचे चर खोदले जातात. या चर खोदण्याचा परिणाम रस्त्यांच्या दर्जावर होत असल्याची माहिती काही वर्षांपूर्वी प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात दिली होती.
– मुंबईकर अनुभवतायत माथेरानपेक्षा अधिकची थंडी

धोरण तयार करा
चर खोदण्याची परवानगी देण्यासाठी जीओटॅगिंगचा वापर होणे गरजेचे आहे. तसेच बेकायदा चर खोदणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतही धोरण ठरविण्याची गरज असल्याचे रईस शेख यांनी नमूद केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button