?Big Breaking..छोटा राजनच्या भावासह बिल्डरविरोधात खंडणीचा गुन्हा
मुंबई – चेंबूर छेडानगरमधील बंगल्यावर बोलावून सोसायटी पदाधिकाऱ्यांना धमकावून जबरदस्ती वकालत नाम्यावर स्वाक्षरी घेतल्याच्या आरोपाखाली गॅंगस्टर छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे आणि बांधकाम व्यावसायिक मुकेश पटेलविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
80 वर्षीय तक्रारदार सध्या गोवंडी शिवाजी नगरमधील ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहतात. ते संत नामदेव गृहनिर्माण सोसायटीचे सदस्य आहेत. त्यांना व इतर व्यक्तींना छेडा नगरमधील निकाळजेच्या बंगल्यावर बोलावून जबरदस्ती स्वाक्षरी घेण्यात आली. त्यासाठी आणखी एका सदस्याकडून 50 हजार रुपये जबरदस्तीने घेण्यात आले. 3 फेब्रुवारीला संपूर्ण प्रकार घडला. घटनेनंतर याप्रकरणी तक्रारीनंतर पंतनगर पोलिसांनी कलम 384 आणि 34 अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल केला.
अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय दराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी निकाळजेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. प्राथमिक चौकशीत आरोपीने दस्ताऐवज स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला. हा प्रकार निकाळजेच्या घरीच झाल्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल.






