सेवानिवृत्त फौजी अंबादास निफाडेंचा जनसेवेचा मानस
उदय वायकोळे चांदवड
चांदवड : मूळचे कुसुमाग्रजांच्या शिरवाडे गावाचे रहिवासी असलेले व सध्या चांदवड येथील रहिवासी असलेले श्री अंबादास शांताराम निफाडे हे जवळपास 18 वर्षे देशाच्या सीमेवर सेवा बजावून मागील वर्षी सैन्यदलातून निवृत्त होऊन आले आहेत. मागील वर्षीपासून त्यांनी जुने मित्रपरिवार यांचेशी जनसंपर्क वाढविला असता लक्षात आले की चांदवड नगरपरिषद हद्दीत आपण जेथे राहतो तेथे व गावातील अनेक भागांमध्ये गैरसोयी आहेत. फौजेची शिस्त असलेल्या व्यक्तीला हे रुचेलच कसे? त्यांना मित्रपरिवाराने व परिसरातील नागरिकांनी सांगितले की इतके दिवस देश सेवा केली आता शहरातील नागरिकांची जनसेवा करा,त्या अनुषंगाने पुढे होऊ घातलेल्या चांदवड नगरपरिषद निवडणुकीसाठी अंबादास निफाडे हे त्यांच्या पत्नी सौ वनिता निफाडे यांचेसाठी वरचे गाव परिसरातून नगरपरिषद उमेदवारीसाठी प्रयत्न करीत असल्याचे समजते.
अनेक सामाजिक उपक्रमात दोघं पतीपत्नीनी सहभाग सुरू केला असून सध्या ते भाजप कडून उमेदवारीसाठी इच्छूक असल्याचे समजते. चांदवडच्या पारंपरिक राजकारणात एका सेवानिवृत्त फौजीने उतरण्याची बहुधा पहिलीच वेळ असून फौजेतील शिस्त व कार्यतत्पर पणा येथे सुद्धा उपयोगात येतो किंवा नाही हे वेळच ठरवेल.






