Amalner

?️ अमळनेर कट्टा… मराठा मंगल कार्यालयाकडून नगराध्यक्षा यांच्याकडे थकीत कर धनादेश सुपूर्द शहराच्या विकासासाठी कर भरणा महत्वाचा

?️ अमळनेर कट्टा… मराठा मंगल कार्यालयाकडून नगराध्यक्षा यांच्याकडे थकीत कर धनादेश सुपूर्द शहराच्या विकासासाठी कर भरणा महत्वाचा

अमळनेर : शहरातील मराठा मंगल कार्यालायकडून मालमत्ता करापोटी अमळनेर नगरपरिषदेला ७४ हजार ६३७ रुपयांचा धनादेश अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्याकडे देण्यात आला.
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी हा धनादेश स्वीकारला.यावेळी धनादेश देतांना मराठा मंगल कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कराच्या माध्यमातून आलेला पैसा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच उपयुक्त ठरत असतो, जास्तीत जास्त नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी आपल्याकडे असलेला कर भरून नागरपरिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
यावेळी बांधकाम सभापती सुरेश आत्माराम पाटील,नगरसेवक मनोज पाटील,अँड.यदनेश्वर पाटील,शेखर देशमुख तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button