?Big Breaking..70 दिवसांत शेतकरी दिसले नाहीत..परदेशी हितचिंतक रेहाना दिसताच क्रिकेट आणि बॉलिवूड चे उंदीर बिळातून बाहेर…!कोण रे हा सचिन..!अन्न च खातो ना..!
भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते. सचिनचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे पण सचिनच्या या ट्विटनंतर भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनीही यावेळी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा
ख्यातनाम पॉप गायिका रिहाना, स्वीडनमधील किशोरवयीन पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची आणि प्रथितयश वकील मीना हॅरिस यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केंद्र सरकारच्या वादग्रस्त तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सोशल मीडियावरून पाठिंबा जाहीर केला आहे.
सचिन तेंडुलकरने काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत काल एक ट्विट केले होते. या ट्विटनंतर चांगलाच वादंग सुरु आहे.हा सचिन कोण आहे..!अन्नच खातो ना..! की पैसे घेऊन सरकारचे कँपेनिंग करतो आहे..?देशासाठी क्रिकेट खेळतो तर काही फुकट खेळत नाही..!दाबून पैसाही कमावतो..!एक माणुसच आहे ना त्याला का भगवान वै ची पदवी..? भगवान आहे तर मग विना पैशाने खेळ ना बाबा..! एव्हढं मोठं आंदोलन सुरू आहे गेल्या 70 दिवसांपासून आता पर्यंत आठवण आली नाही..!एकही प्रतिक्रिया नाही पण आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिक्रिया उमटू लागल्यामुळे कुठे तरी अस्तित्व दाखविण्यासाठी ही केविलवाणी धडपड अरे पण योग्य ठिकाणी आणि योग्य लोकांना पाठींबा जाहीर कर ना बाबा..!एव्हढं मोठ्या आंदोलनाला आर्थिक मदत करण्यासाठी एकही करोडपती क्रिकेटपटू किंवा काही अपवाद वगळता फिल्म स्टार पुढे आला नाही..!
सचिनने नेमके काय ट्विट केले होते…
भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले होते.
शेतकरी आंदोलनाबाबत विराट कोहली म्हणाला…
सध्याच्या घडीला या कठीण प्रसंगी आपल्या सर्वांनीच एकजूट दाखवण्याची गरज आहे. शेतकरी हे आपल्या देशातील महत्वपूर्ण घटक आहेत. मला वाटते की, याबाबत नक्कीच तोडगा निघेल. सध्या घडीला आपण सर्वांनीच शांत राहून पुढचा विचार करणे गरजेचे आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पॉप स्टार रिहानाने पाठिंबा दिला होता. यावरून देशातील अनेक स्टार लोकांनी सडेतोड उत्तर दिले. भारताच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही, अशा शब्दात रिहानाला अनेकांनी ऐकवले. आता भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील रिहानाला सुनावले होते.
शेतकरी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास 70 दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परदेशी कलाकारदेखील पुढे आले आहेत. काल (मंगळवारी) गायिका रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्विट केले आहे. आता माजी पोर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातून याला विरोध होत आहे. हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांनीही याला पाठिंबा दिला आहे.
त्यानंतर भारतातील काही क्रिकेटर्स आणि बॉलिवूडच्या मंडळींकडून ‘ही भारताची अंतर्गत बाब‘ असल्याचं सांगत केंद्रातील सरकारकडून तयार करण्यात आलेल्या #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या दोन हॅशटॅगचाही वापर करण्यात आला. यावरून काँग्रेस नेते शशी थरुर यांनी सत्ताधाऱ्यांची ‘री’ ओढणाऱ्या सेलिब्रिटींना खडे बोल सुनावले आहेत.
‘भारत सरकारसाठी प्रसिद्ध भारतीय मंडळींनी पाश्चिमात्यांवर पलटवार करणं लाजिरवाणं आहे. भारत सरकारची अडीग वृत्ती आणि लोकशाहीविरोधी वर्तनामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला जे नुकसान झालंय त्याची भरपाई क्रिकेटर्सच्या ट्विटमुळे होऊ शकत नाही’ असं शशी थरूर यांनी म्हटलंय.
माजी क्रिकेटर्स सचिन तेंडुलकरअनिल कुंबळे, विराट कोहली ,रवी शास्त्री यांनी देखील हे हॅशटॅग वापरून ट्विट करत सरकारला पाठिंबा दिला होता. ‘भारत काय आहे ते भारतीयच जाणतात आणि भारताचं काय करायचं ते भारतीयच ठरवतील. यात बाहेरच्यांनी पडू नये. भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होऊच शकत नाही’ असं सचिननं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.







