?️ अमळनेर कट्टा..प्रहार महाराष्ट्र राज्य दिव्यांग शासकिय निमशासकिय कर्मचारी व अधिकारी संघटनेची सभा संपन्न
रजनीकांत पाटील अमळनेर
अमळनेर : जिल्हा अध्यक्ष श्री पांडुरंग चौधरी यांच्या हस्ते तथा मार्गदर्शनाखाली अमळनेर प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले व सर्व समस्या व पुढील वाटचालीवर सखोल चर्चा करण्यात आली. त्यावेळी सर्व जिल्हा पदाधिकारी -कार्यकारीणी सदस्य श्री मनोहर महाजन सर ,श्री.दिपक आनंदराव पाटील सर ,श्री.अविनाश पाटील यांच्या समवेत
तालुका अध्यक्ष श्री.चंद्रकांत पाटील सर ,सचिवश्री.गजानन चौधरी सर, उपाध्यक्ष श्रीम मनीषा चौधरी मॅडम श्री.सुधीर चौधरी सर श्री.विठ्ठल पाटील सर, महेंद्र पाटील,प्रा दिनकरराव सूर्यवंशी सर,श्रीरोहिदास राठोड,श्री दीपक लोहारश्री.विलास धना पाटील सर व सर्व पदाधिकारी व सदस्य तथा मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले .अध्यक्षीय भाषण श्री पांडूरंग चौधरी सर यांनी केले.
मनोगत श्री.चंद्रकांत पाटील सर यांनी केले.
आभार प्रदर्शन श्री गजानन चौधरी व सुत्रसंचलन श्री सुधीर चौधरी सर यांनी केले.







