Chandrapur

?थोडं वेगळं..अन पराभूत उमेदवार झाला विजयी..3 दिवसाच्या आनंदउत्सवावर विरजण.. नेमका काय घडला प्रकार..!

?थोडं वेगळं..अन पराभूत उमेदवार झाला विजयी..3 दिवसाच्या आनंदउत्सवावर विरजण.. नेमका काय घडला प्रकार..!

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झाली.अनं विजयी झाल्याचे सांगत तो बाहेर आला. पॅनल सोबत त्याने गावात जल्लोष केला.फटाकेही फोडले.विजयाच्या आंनदात आज गावातील नवनियुक्त उमेदवार प्रमाणपत्र घेण्यासाठी तहसिल कार्यालयात गेले.यावेळी त्या प्रभागातून दुसराच उमेदवार विजयी असल्याचे त्यांना समजले.अनं एकच धक्का बसला.अशा अनपेक्षित निकालाने धक्का बसल्याने त्यांनी चैकशी केली.अन तो पराभूत असल्याचे स्पष्ट झाले.दुसरीकडे पराभूत समजणाÚया उमेदवाराला आपला विजय झाल्याची माहिती मिळाली अनं त्याच्या आंनदाला पारावार उरला नाही.राजकारणात कधी काय होईल याचा प्रत्यय देणाÚया भंगाराम तळोधीतील या घटनेची तालुक्यात खमंग चर्चा आहे.
ग्रामपंचायत भंगाराम तळोधी येथील प्रभाग क्रं. 4 ची निवडणुक संपन्न झाली.अनु.जमातीसाठी राखीव असलेल्या या प्रभागातून भाजपचे कमलेश गेडाम व काॅग्रेसचे मनोज सिडाम हे उमेदवार आमनेसामने होेते.निवडणुकीनंतर अठरा जानेवारी रोजी मतमोजणी संपन्न झाली.मतमोजणीदरम्यान कमलेश गेडाम व समर्थकांनी आपला विजय झाल्याचे सांगत जल्लोष केला.गावातही फटाके फोडून आंनद साजरा करण्यात आला.आपला पराभव झाल्याचे समजून मनोज सिडाम हा हिरमुसला होता.दरम्यान आज भंगाराम तळोधी येथील काही नवनियुक्त विजयी उमेदवार प्रमाणपत्र घेण्याकरिता तहसिल कार्यालयात गेले.

आपले प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यांनी इतर विजयी उमेदवारंाच्या प्रमाणपत्राबाबत विचारणा केली.त्यावेळी प्रभाग क्रं. 4 मधून मनोज सिडाम विजयी झाला असून कमलेश गेडाम यांचा पराभव झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.हि माहिती कळताच त्यांना धक्का बसला.लागलीच चैकशीला सुरवात झाली.तहसिलदार के.डी.मेश्राम यांनी त्यांना सविस्तर तपशील दाखवित निकाल बरोबर असल्याचे सांगीतले.इकडे पराभूत समजणाÚया मनोज सिडाम यांना आपला विजय झाला असल्याचे समजताच त्यंाच्या आनंदाला पारावार उरला नाही.राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही.याचा प्रत्यय देणाÚया भ्ंागाराम तळोधीतील या घटनेची तालुक्यातील राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे.
नेमके असे झाले
ईव्हिएम वर क्रमांक 1 वर कमलेश गेडाम यांचे चिन्ह होते.तर क्रमांक दोनवर मनोज सिडाम हे क्रंमाक 2 वर होते.कमलेश गेडाम यांना 218 मत मिळाले तर मनोज सिडाम यांना 236 मते मिळाले.गेडाम व ईव्हिएम मशीनवर पहिल्यांदाच निकाल बघणाÚया त्यांच्या समर्थकांना क्रमांक बघण्यात चूक झाली अन आपणालाच 236 मत आले असा त्यांचा समज झाला.यातूनच त्यांनी आपलाच विजय झाल्याचे समजत जल्लोष केला.पहिल्यांदाच ईव्हिएम वर निकाल बघतांना झालेल्या क्रमांकांच्या घोडचुकीने वरील प्रकार घडला.

विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी ईव्हिएम वर निकाल बघतंाना दुसऱ्याया क्रमांकाचे मत आपले समजून स्वतलच विजयी समजले.यातूनच हा प्रकार घडला.प्रशासनाने मनोज सिडाम यांनाच विजयी घोषित केले होते.आज आलेल्या नवनियुक्त विजयी उमेदवारांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला.
के.डी. मेश्राम
तहसिलदार गोंडपिपरी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button