अभाविप चे जात पडताळणी कार्यालयासमोर आंदोलन
उदय वायकोळे नाशिक
नाशिक : जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ होत असल्याचे वृत्त ठोस प्रहार ने 3 दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते.
जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने समाज कल्याण कार्यालय येथे 500 पेक्षा जास्त विद्यार्थी ताट कळत उभे असल्याचे चित्र दि 19 जानेवारी 2021 रोजी सुद्धा दिसत होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक तर्फे काल 5 तास आंदोलन समाजकल्याण कार्यालय नाशिक येथे सुरू केले होते
जात प्रमाणपत्र संदर्भातील अभाविप नाशिक च्याआंदोलनाला यश मिळाले आहे.मध्यरात्री १ वाजता उपस्थित विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप सुरू होऊन सकाळी ८ वाजेपर्यंत २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र रात्रभरात प्रत्यक्ष देण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर अभाविप नाशिक सोबत संपर्क साधा अभाविप प्रत्येक संघर्षात आपल्या सोबत आहे.काही अडचण असल्यास 8530971949 क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
यावरून जात पडताळणी साठी विद्यार्थ्यांची होणारी फरपट थांबून वेळेवर कामे पूर्ण करावीत हीच अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करीत आहेत






