अतिक्रमण धारकांवर कारवाई न केल्यास 26 जानेवारी रोजी बेमुदत उपोषण
युसूफ शाह सावदा
सावदा : येथील नगरपालिका हद्दीत येणाऱ्या गौसियानगर भागात गट क्रमांक 1209 प्लाट नंबर 6 ते 10 व गट क्रमांक 1214 प्लाट 28 चे जागेवर वाळूबंदी असतांनाही अवैधरित्या वाळू आणून एक वर्षापासुन इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा या संस्थेकडून एक भव्य इमारत बांधली जात आहे. येथील इमारत मंजूर नकाशानुसार नसून, उलट येथील इतर प्लाट धारकांच्या हक्कावर गदा आणून ओपन स्पेसवर बांधकाम सुरू असून, तेथे मनमानीपणे वापर केला जात असल्याचे लेखी तक्रार सर्व संबंधित अधिकारी यांना केलेली आहे
या लोकांवर कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा अन्यथा येत्या “गणराज्य दिनी” . 26 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता न पा कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा येथील रहिवासी नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे कडे केली आहे.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, येथील ओपन स्पेसवरील अतिक्रमण आणि वापर संदर्भात प्लाटधारक व संस्था चालकांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे चार संचालकांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. येथील सर्व गंभीर प्रकरणाची माहिती सर्व संबंधित अधिकारी यांना असुनही आजतागायत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच वाळूबंदीच्या काळात इमारत बांधण्यासाठी वाळू कोठून व कशी मिळविली. याचीही चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही. याआधी या संदर्भात सविस्तर लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. मात्र येथील गंभीर व दखल पात्र गैर प्रकारा बद्दल दक्षता घेतली गेलेली नाही. आता तरी जागे व्हा आणि दखल घेऊन कारवाई करावी. अन्यथा येत्या 26 जानेवारी रोजी बेमुदत उपोषण सुरू केले जाईल. या दरम्यान काही बरे वाईट झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी आपणावर राहिल. असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर गौसियानगर भागातील पंधरा रहिवासी नागरीकांच्या साक्षरी आहेत. बेमुदत उपोषण संदर्भात मुख्याधिकारी सौरभ जोशी. प्रांताधिकारी फैजपुर, जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक जळगांव आणि सपोनि सावदा यांच्याकडे लेखी पत्र पाठवले आहे.






