Faijpur

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नारीशक्ती गृप तर्फे महिला शिक्षिकांचा सन्मान

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नारीशक्ती गृप तर्फे महिला शिक्षिकांचा सन्मान

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या व प्रथम स्त्री शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे खान्देश नारीशक्ती गृप,दिपाली गृप्स अध्यक्षा व भाजपा कार्यकर्त्या सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या तर्फे स्त्री शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.आशा सुरेश राणे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले तसेच सौ.उल्का पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते सौ.कविता प्रशांत इंगळे शिक्षिका शांती विद्यामंदिर फैजपूर,सौ.प्रिती कांतिलाल चौधरी शिक्षिका शांती विद्यामंदिर फैजपूर,सौ.चित्रा विजय तायडे मुख्याध्यापिका जि.प.केंद्र शाळा थोरगव्हाण,सौ.उल्का प्रकाश पाटील पर्यवेक्षीका स्वामिनारायण गुरुकुल सावदा,सौ.स्मिता राणे शिक्षिका जि.प.शाळा कोचूर यांचा सत्कार करण्यात आला.सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.आशा राणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनाविषयी मनोगत व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button