सत्ताधारी कडून न. पा. ला घरचा आहेर! सावदा शहर कचरा मुक्त करण्यासाठी पालिकेने दखल घेत सुरू केली स्वच्छता मोहीम !
यूसुफ शाह सावदा
सावदा : येथिल नगरपालिका अंतर्गत असलेल्या काही भागात कचरा उचलला जात नसल्याची तक्रार सत्ताधारी नगरसेविका नंदाबाई लोखंडे यांनी केली असता, पालिकेला घरचाच आहेर दिला आहे. परिणामी त्यांच्या तक्रारीवरून नवीन वर्षात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी सांगितले आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, शहरात गावाची स्वच्छता किती झाले आहे. हे दाखवण्या करिता स्वतःनगरसेविका नंदाबाई लोखंडे यांनी मुख्याधिकारी यांच्या सोबत जाऊन गावाची पाहणी करून, जेथे कचरा पडलेला आहे. त्याबद्दल जाब विचारला . तसेच आंबेडकर मार्केट अनेक वर्षांपासून त्याठिकाणी लोकांना भाड्याने दुकान घेतलेली आहे. परंतु त्यांच्याकडून दुकानांचे भाडेपट्टी वसूल करण्यात येते. झाडांची कर वसूल करण्यात येते. व नगरपालिका त्यांना साफसफाईसाठी एकही कर्मचारी देत नाही. अनेक वर्षापासून त्या लोकांनी गाळे विकत घेतलेले आहे. प्रशासनाला त्यांच्यापासून आर्थिक मदत मिळते. सफाई पासून त्या लोकांना का वंचित ठेवले जाते. नगरपालिका आरोग्य विभागाने याचे उत्तर आम्हाला द्यावे. पुढे त्यांनी सांगितले की, स्वच्छतेच्या नावाखाली अनेक प्रकारचे टेंडर निघत आहेत. परंतु गावाची स्वच्छता तशी होत नाही. एकीकडे सरकार म्हणते कोरोना चे पार्श्वभूमीवर सर्व नगरपालिकेच्या गावामध्ये साफ-सफाई कचरा व प्लास्टिक मुक्त व्हायला पाहिजे. त्यांच्यामुळे कोरणा मुक्त, परंतु असं काही होत नाही. असा आक्षेप घेऊन, लोखंडे यांनी पालिकेला घरचाच आहेर दिला. तसेच आम्ही लोकप्रतिनिधी आहेत. नगरपालिकेचे नगरसेवक आहोत, आम्हाला कुठल्याही प्रकारच नगरपालिकेचं सहकार्य लाभत नाही.असा आरोप करीत गावामध्ये रोगराई पसरलेली आहे. जंतू फवारणी केली जात नाही. ओला कचरा व सुका कचरा बाजूला करण्यासाठी ज्या मुलांची टीम लावलेली आहे, ते समाधानकारक काम करत नाहीत. असे जनतेमधून आम्हाला सांगण्यात आलेले आहे. तरी प्रशासनाने त्वरित या गावांमध्ये स्वच्छतेची मोहीम राबविण्यात यावे अशी तक्रार लोखंडे यांनी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे कडे केली आहे.
याबाबत मुख्याधिकारी यांना विचारले असता, त्यांनी नगरसेविका नंदाबाई लोखंडे यांच्या तक्रारीची दखल घेऊन नविन वर्षाच्या आरंभा पासूनच शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगून, दररोज विविध भागात स्वच्छतेचा आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले . , नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून कचरा गाडीत टाकावा. रस्त्यावर कोणीही कचरा टाकू नये. या स्वच्छता मोहीम मध्ये नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी केले आहे.






