Nandurbar

संचारबंदी कालावधीत 31 जानेवारी पर्यंत वाढ

संचारबंदी कालावधीत 31 जानेवारी पर्यंत वाढ

फहीम शेख नंदुरबार

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 30: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग तसेच अनलॉक फेजमध्ये सुधारीत सूचना व पुन्हा प्रारंभ मोहिमेंतर्गत शासनाकडील वेळोवेळी शिथिल निर्बंध व सुट मुभा देण्यात आलेल्या बाबीं संदर्भातील आदेश कायम ठेवून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यात शुक्रवार 1 जानेवारी 2021 मध्यरात्रीपासून 31 जानेवारी 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदीस मुदतवाढ दिली आहे.

कोणत्याही व्यक्ती, समुह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button