Maharashtra

Dilache Talk…होय..! पुरुषांचा मेनोपॉज..!जाणून घ्या लक्षणे आणि उपाय..!

महत्वाचे..पुरुषांचा मेनोपॉज..!

साधारणपणे मेनोपॉज म्हटला म्हणजे तो स्त्रियांशी निगडित असतो असा साधारण पणे लोकांचा गैरसमज असतो.मेनोपॉज म्हणजे स्त्रियांचा रजोधर्म (मासिक पाळी) बंद होत असतांना चा कालावधी ज्यात स्त्रियांना अनेक प्रकारच्या बदलांना सामोरे जावे लागते. साधारणतः ४५व्या वर्षापासून ही क्रिया होण्यास सुरुवात होते. याच क्रियेला रजोनिवृत्ती म्हणतात आणि गर्भधारणा बंद होते. पण या प्रमाणेच पुरुषांमध्ये पण असं काही होतं का? हा प्रश्न उपस्थित झाला..तर हो पुरुषांचाही मेनोपॉज असतो आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास ही पुरुषांना होत असतो.पण आपल्या भारतीय संस्कृती तच नव्हे तर वैश्विक पातळीवर स्त्रियांचा मेनोपॉज आणि त्याचा त्रास यावर खूप भर दिला जातो. परंतु पुरुषांच्या ह्या अवस्थेकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. आज आपण ह्या लेखाच्या माध्यमातून पुरुषांचा मेनोपॉज आणि त्याचा होणारा त्रास याबाबतीत जाणून घेऊ..

स्त्रियां प्रमाणेच पुरुषांमध्ये पण असं काही होतं का? ८० वर्षापर्यंतचे पुरुष पिता झालेले ऐकले किंवा वाचले आहे. मग वस्तुस्थिती काय आहे ?

स्त्रियांना रजोनिवृत्ती येण्याचं कारण म्हणजे अंडाशयातून स्रवणारे इस्ट्रोजेन नावाचे हार्मोन हे वयाच्या ४५ वर्षांपासून कमी होण्यास सुरुवात होते. ते काही काळानंतर संपूर्णपणे बंद होते. त्याचमुळे त्याच्या प्रभावाने सुरू असलेला मासिकधर्म बंद होतो.ह्या वैद्यकीय नियमानुसार अगदी त्याचप्रमाणे पुरुषांच्या शरीरात वृषणाद्वारे स्रवत असलेले टेस्टेस्टेरॉन हे हार्मोन हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते, पण तरीही शुक्राणू तयार होणं सुरू असल्याने त्यांना अपत्य होऊ शकतं. स्त्रियांप्रमाणे हे हार्मोन स्रवणं पूर्णपणे बंद होत नाही. याचमुळे अगदी अलीकडे स्त्रियांप्रमाणे पुरुषांमध्येही असा बदल वाढत्या वयाबरोबर होऊ शकतो हे मान्य झालं तेव्हा बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं. पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरॉन हे हार्मोन स्त्रियांप्रमाणे अगदीच बंद होत नाही प्रमाण कमी जास्त होत असते..

हे हार्मोन रक्तात दोन प्रकारे आढळत असते. एक म्हणजे ते रक्तातील सेक्स हार्मोन्स बंधक प्रथिनांसोबत आढळते, तर दुसरे म्हणजे फ्री (मुक्त) टेस्टेस्टेरॉन. तरुण वयात फ्री टेस्टेस्टेरॉन जास्त प्रमाणात असते पण जस जसे वय वाढते तसतसे रक्तातील फ्री टेस्टेस्टेरॉनचे रक्तातील प्रमाण कमी होतं. त्याचमुळे या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे स्त्रियांप्रमाणे पुरुषांमध्येही काही लक्षणं येण्यास सुरुवात होते. यालाच अँड्रोपॉझ म्हणजेच पुरुषांच्या सेक्स हार्मोन्सच्या कमीमुळे होणारा आजार असं संबोधतात. अशी अवस्था पुरुषांच्या आयुष्यात साधारणतः वयाच्या ४० ते ५० वर्षादरम्यान सुरू होते. स्त्रियांप्रमाणे शेवटची मासिक पाळी असं काही निश्चित पुरुषांमध्ये नसतं व ही प्रक्रिया फार हळूहळू होत असते.

या अवस्थेची प्रमुख लक्षणं, अर्थातच टेस्टेस्टेरॉन या हार्मोन्स कमी होत असताना वेगवेगळी लक्षणे दिसतात यात लैंगिक इच्छा कमी होणं, शिश्नाची ताठरता न येणं किंवा कमी होणं, बौद्धिक शक्ती कमी होणं,शारीरिक क्षमता कमी होणं, लठ्ठपणा येणं, टक्कल पडणं, हात पाय दुखणं,मन अस्थिर होऊन चिडचिडेपणा येणं ही लक्षणं दिसून येतात. जर ही कमतरता खूप दिवसांपासून असल्यास हाडांचे विकार म्हणजे ऑस्टिओपेनिया व ऑस्टियोपीरोसिस यांचा त्रास सुरू होतो.

पुरुषांच्या मानसिक अवस्थेत बदल होतो. बऱ्याचदा निराशा, त्रागा, चिडचिड व कामात नीट लक्ष नसणं अशा तक्रारी संभवतात. या सर्व त्रासांमुळे या रुग्णांना टेस्टेस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी सुरू करणं आवश्यक असतं. अर्थात टेस्टेस्टेरॉन देण्यावरूनही बरेच मतभेद आहेत. कारण टेस्टेरॉनमुळे प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो यामुळे कर्करोग होऊ शकतो.त्याचमुळे या वयात असा त्रास संभवल्यास प्रथमतः त्या पुरुषाचे एकूण व फ्री टेस्टेस्टेरॉनची पातळी (रक्तातील) किती आहे व हे पाहूनच टेस्टेस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी सुरू करावी लागते.

टेस्टेस्टेरॉन या हार्मोन्सचे इंजेक्शन तसेच गोळ्या पण उपलब्ध आहेत. त्या अशा पुरुषांना देऊन त्यांचा त्रास कमी करता येऊ शकतो. त्याचबरोबर अशा पुरुषांना लैंगिक समस्या असल्यास त्यावर पण उपाययोजना करून त्यांचे जीवन आनंदी करू शकतो.

त्यामुळे पुरुषांचा मेनोपॉज हा गैरसमज नसून पुरुषांमध्ये ४० शीच्या शेवटच्या टप्प्यात आणि ५० शी च्या सुरवातीच्या टप्प्यात काही शारीरिक, मानसिक, भावनिक, लेंगिक बदल किंवा लक्षणे दिसून येतात. या सर्व लक्षणावरून समजते की हा अँड्रॉपोज चा काळ आहे. हार्मोनल इमबॅलन्समुळे स्त्रियांमध्ये होणारे बदल आणि मेन मोनोपॉजची ही लक्षणे साधारणपणे सारखीच असतात.

साधारपणे ही लक्षणे मध्यम वयात दिसून येतात. आयुष्याचा अर्धा टप्पा पूर्ण झाल्यावर ही फेज येते म्हणून याला ‘मिडलाईफ क्रायसेस’ असे म्हणतात. या सर्व लक्षणांसाठी आर्थिक अडचणी, नातेसंबंधातील समस्या, व्यस्त जीवनशैली आणि आरोग्यविषयी समस्या इत्यादींमुळे येणारा ताण आणि वाटणारी काळजी या गोष्टी कारणीभूत ठरतात.

पुरुषांना ठळकपणे जाणवतील अशी याची लक्षणे कोणती?

फीमेल मोनोपॉजप्रमाणे हे देखील गंभीर असते का ? तर हो..याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.. वारंवार येणारे नैराश्य,सेक्सची इच्छा न होणे, मूड सविंग्स, कोरडी आणि पातळ त्वचा, थकवा, अधिक घाम येणे इ मुळे संबधित पुरुषांच्या वैवाहिक सामाजिक, सांस्कृतिक, नोकरी क्षेत्रांत समस्या निर्माण होऊ शकतात. सगळ्यांच पुरुषांमध्ये सारखी लक्षणे आढळत नाहीत. या लक्षणांची तीव्रता आणि प्रकार हे व्यक्तीनुसार बदलते.

एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांच्या सल्ल्याने ह्या समस्येवर उपाय योजना करता येऊ शकते .योग्य प्रकारचं समुपदेशन ह्या अवस्थेतून बाहेर पडण्यास मदत करू शकते.सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेगळं जाणवू लागताच आपल्या विश्वासु जवळच्या व्यक्तीसोबत सगळं शेअर करने आवश्यक आहे. या गोष्टी मनात ठेवण्यापेक्षा शेअर केल्यास बरं वाटतं. आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास स्थिती सुधारण्यास आणि लक्षणे आटोक्यात येण्यास मदत होते. त्याचबरोबर आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून आयुष्यात पुढे जाण्याची मानसिकता विकसित होण्यास मदत होईल.उत्तम आहार आणि व्यायाम यामुळे मन आणि तन तंदुरुस्त राहील.

यावर उपाय आहे का? तर हो…

यावर अनेक उपाय आहेत आणि लक्षणांच्या गंभीरतेनुसार केले जातात. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ऑलोपेथिक औषधे, समुपदेशन, वागण्यातील बदल असे अनेक उपाय आहेत.स्वतः ला आत्मविश्वासु बनवणं,न्यूनगंड काढून टाकणे,मनातील सर्व भावना शेअर करणे इ मुळे ह्या मेनोपॉज च्या अवस्थेवर विजय मिळवता येऊ शकतो.

या परिस्थितीत पुरुषांचा ‘manly’ पणा कमी होतो..? तर हो..!

तर हो टेस्टेस्टोरेनच्या कमतरतेमुळे पुरुषांना manly ness कमी होतांना जाणवतो..काही लक्षणांना सामोरं जाताना असं वाटू शकतं. अचानक सेक्सुअल इनअक्टिव्हनेस येतो. त्यामुळे मनात अशी शंका येऊ शकते.

मेनोपॉजचा हा काळ कधी व केंव्हा संपतो?

तसं तर हे सांगणं खरंतर कठीण आहे. काही लक्षणं मरेपर्यंत दिसून येतात. तर काही काळानुसार विरून जातात. काही लक्षणे औषधांनी आटोक्यात येतात आणि त्या व्यक्तीला पुन्हा आत्मविश्वास मिळवून देण्यास मदत करतात. त्यामुळे ती व्यक्ती आनंदी आयुष्य जगू शकते.परंतु योग्य जीवन शैली,योग्य ते व्यायाम यामुळे निश्चितपणे फरक पडू शकतो.यासाठी
नियमित योग,प्राणायाम, व्यायाम केल्यामुळे,योग्य तो आहार घेतल्याने परिस्थिती बदलू शकते.संवाद साधणे,मन मोकळे करणे,हा उत्तम पर्याय असू शकतो. तुमच्या जवळच्या व्यक्तीशी किंवा डॉक्टरांशी याबद्दल बोलणे आवश्यक आहे. साधारणपणे पुरुष आपल्या आरोग्यविषयक तक्रारी कोणालाही पटकन सांगत नाही सांगणे.मी किती फिट आहे किंवा तंदुरुस्त आहे हे दाखविण्याकडे त्यांचा कल अधिक असतो. पण असं न करता समस्या गंभीर होण्याआधी ती खुलेपणाने सांगून त्यावर मार्ग काढणे शक्य आहे.

पुरुषाच्या ह्या स्थितीत पत्नीची भूमिका..?

पत्नीने आपल्या पतीची ही अवस्था समजून घेऊन ह्या नाजूक काळात त्याला आधार देणे. त्याच्या अवस्थेबद्दल त्याची चेष्टा करण्याऐवजी जे काही मनात आहे, जे काही वाटतं ते बोलण्यास प्रवृत्त करणे. सेक्सुअली कमी पडत असेल तरी त्याचा पुरुषार्थ जपण्याचा प्रयन्त करा.

– बरं, आपण प्रत्येक क्षणाने आनंदाने आयुष्य जगले पाहिजे. परंतु स्त्रियांप्रमाणे एखाद्या विशिष्ट वयानंतर पुरुषांना देखील विशेष काळजीची आवश्यकता असते. याकडे दुर्लक्ष केल्यास घातक परिणाम होऊ शकतात. म्हणून निरोगी राहण्यासाठी आनंदी रहा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button