Amalner

?Big Breaking..अवैध वाळू वाहतूक करतांना ट्रॅकटर जप्त..तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी केली कार्यवाही..

?Big Breaking..अवैध वाळू वाहतूक करतांना ट्रॅकटर जप्त..तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी केली कार्यवाही..

अमळनेर आज दिनांक १८/१२/२०२० रोजी विजय शॉपी, अमळनेर येथे अवैध रित्या गौण खनिज वाळू वाहतूक करताना एक ट्रॅक्टर आढलुन आले असता सदर ट्रॅक्टर मुद्देमालासह पोलीस स्टेशन अमळनेर येथे जमा करण्यात आले आहे. अमळनेर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सर्व वाळू माफियांवर चांगली च जोरदार मोहीम तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शहरात बोरी नदी पात्र तसेच पांझरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो. शहरात वाळू माफियांची मोठी टोळी कार्यरत आहे. परंतु या अवैध वाळू वाहतुकीवर सतत दबंग कार्यवाही करत अमळनेर नगरीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सातत्याने कार्यवाही करत आहेत. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सतत होणाऱ्या कार्यवाईंमुळे वाळू माफियांना चांगलाच वचक बसला आहे.सदर ट्रॅकटर हे आमदार समर्थक बाळू पाटील यांचे असल्याची माहिती मिळाली आहे.

आज केलेल्या कार्यवाहीच्या पथकात तलाठी गांधली प्रकाश महाजन, संदीप शिंदे तलाठी रणाईचे इ चा समावेश होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button