नागरिक त्रस्त नगरपरिषद अधिकारी मात्र चुस्त
उदय वायकोळे चांदवड
चांदवड : चांदवड शहरात नगरपरिषद 2015 साली स्थापन झाल्यापासून शहरात सुधारणा होतील अशी आशा नागरिकांना होती मात्र नागरिकांचा 2020 मध्ये सुद्धा भ्रमनिरास झाल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. सविस्तर वृत्त असे की गेल्या 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावर चांदवड शहरातील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत असून यात सोमवार पेठ येथील रहिवासी व प्रतिष्ठित नागरिक श्री चंद्रशेखर जाधव यांनी गेल्या दोन महिनापासून सोमवार पेठ परिसरात गढूळ पाणीपुरवठा होत असून नगरपरिषद दुर्लक्ष करीत असल्याचे सांगून गढूळ पाणी भरलेली बाटलीचे छायाचित्र सोशल मीडियावर शेयर केले.
गणेश हौसिंग सोसायटी मधील अपूर्णावस्थेत असलेल्या रस्त्याचे फोटो सोशल मीडियावर आले असून यातून नागरिक भावना व्यक्त करीत आहेत.
रवींद्र बागुल नामक सामाजिक कार्यकर्त्याने नगरपरिषदेतील एक अधिकाऱ्याची चौकशी करून निलंबनाची कारवाई होण्याचे पत्र प्रशासक यांना देऊन त्याची प्रत सोशल मीडियावर शेयर केली होती मात्र 1 दिवसात संबंधित व्यक्तीने तक्रार लेखी देऊन मागे घेतल्याने नागरिकांमध्ये खरपूस चर्चा रंगली होती.






