Mumbai

? Big Breaking..शाळेतील शिपायांची पदे रद्द करणारा आदेश मागे घेणार; बच्चू कडू यांचे आश्वासन

शाळेतील शिपायांची पदे रद्द करणारा आदेश मागे घेणार; बच्चू कडू यांचे आश्वासन

ज्यातील सरकारी अनुदानित शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणजे शिपाई किंवा सफाई कर्मचारी आदी पदे रद्द करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जीआर काढला आहे.
सदर जीआर हा रद्द केला जाईल अशी ग्वाही खुद्द शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
विधान परिषदेत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी जीआर रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर राज्यमंत्री कडू यांनी “तातडीने निर्णय घेतला जाईल” असे आश्वासन दिले आहे.
सध्या कार्यरत असलेले चतुर्थश्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर, नवीन शिपाई किंवा चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची भरती प्रक्रिया होणार नाही. असा जीआर काढण्यात आला होता.
त्यामुळे 52 हजार शिपायांची पदे रद्द होऊन तितक्याच लोकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागले असते.
कंत्राटावर शिपाई आणि सफाई कर्मचारी ठेवण्याचे आणि त्याच नुसार त्यांना मोबदला देण्याचे देखील या जीआरमध्ये म्हटले होते.
हा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर अन्याय असल्यामुळे, अनेक स्तरातून आणि विशेषतः शैक्षणिक स्तरातून यावर अनेक जणांनी ताशेरे ओढले होते.
बच्चू कडू आता हा जीआर रद्द करून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिलासा देतात की नाही, हे पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button