अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचे अपात्रेस स्थगिती ! “सत्य परेशान होता है”, पराजित नही! म्हणत कार्यकर्तेनी फटाक्यांची आतषबाजी करून व्यक्त केला आनंद!
युसूफ शाह सावदा ता. रावेर
सावदा : येथील नगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी पदाचा गैरवापर केल्याने त्यांचे पद रद्द करण्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे केल्याने त्यांना गेल्या आठवड्यात अपात्र ठरविण्यात आले होते. याविरोधात राजेंद्र चौधरी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे मुंबई यांच्या कडे अपिल दाखल केले असता त्यांचे अपात्रेस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
या संदर्भात नगरविकास विभागाकडून मिळालेल्या पत्रात म्हटले आहे की, सावदा येथील नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी अपात्रते संदर्भात दिनांक ७ डिसेंबर रोजी चे आदेशाविरुद्ध महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम ४४(४) अन्वये शासनाकडे अपिल दाखल केले असून, अपिलाच्या अनुसंघाने नगरविकास विभाग, मंत्रालय यांच्या कडून प्राप्त आदेशानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशास पुढिल आदेशापर्यत तात्पुरती स्थगिती देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
या संदर्भात चौधरी यांचे अपात्रेस स्थगिती मिळाल्याने त्यांचे समर्थक मित्रमंडळीनी गांधीचौक, गवतबाजार, इंदिरा गांधी चौकात तसेच दुर्गा माता मंदिराजवळ फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. यावेळी अक्षय सरोदे, निखिल बेंडाळे, अंकुश सरोदे, सागर चौधरी, धिरज महाजन, प्रतिक पाटील, सर्वेश लोमटे, शुभम सरोदे, आशिष चौधरी, नकुल महाजन आदी असंख्य उपस्थित होते.
दरम्यान अपात्रते संदर्भात राजेंद्र चौधरी यांनी “भगवान के घर देर है”, अंधेर नही! म्हणत माझे राजकीय आयुष्याची सुरुवात संघर्षांतून झाली आहे. आजही संघर्ष सुरू आहे. भविष्यातही सुरू राहील. पद असो अगर नसो, जनतेची कामे करतच राहणार. अशी रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली.






