भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस पदी अंकुर कासलीवाल
उदय वायकोळे चांदवड
चांदवड : चांदवड येथील रहिवासी असलेले व प्रथम नगराध्यक्ष श्री भूषण कासलीवाल यांच्या मर्जीतील समजले जाणारे श्री अंकुर कासलीवाल यांची नाशिक जिल्हा भाजपा जिल्हा चिटणीस युवा मोर्चा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात अंकुर कासलीवाल यांनी स्वखर्चाने चांदवड शहरातील पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय ,प्रांत कार्यालय, आरोग्य विभाग नगरपरिषद कर्मचारी यांना आर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या वाटप केल्या होत्या.त्यामुळे अंकुर कासलीवाल चर्चेत होते. सध्या ते नगरपरिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा आहे,याच पार्श्वभूमीवर की काय भाजप ने त्यांची नियुक्ती करून कामाची पावती दिली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही






