Maharashtra

1 जानेवारीपासून बदलणार FASTag चे नियम, सुरू होणार खास सर्व्हिस – वाहन मालकांसाठी महत्वाची बातमी.

1 जानेवारीपासून बदलणार FASTag चे नियम, सुरू होणार खास सर्व्हिस – वाहन मालकांसाठी महत्वाची बातमी.

विनोद जाधव

1 जानेवारी, 2021 पासून टोल प्लाजावरील सर्व कॅश लेन डेडिकेटेड काढले जातील ,तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल, तर तुमची गाडी टोलवरून जाणार नाही.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फास्टॅग नसणाऱ्यांकडून दुप्पट पैसे वसूल करण्याचे नोटिफिकेशन देखील जारी केले मात्र आता यामध्ये आणखी एक अपडेट आलं आहे.
जाणून घ्या त्याविषयी सविस्तर या नवीन सुविधेनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोलनाक्यावर गर्दी कमी करण्यासाठी 1 जानेवारीपासून सर्व हायब्रीड लेनवर प्री-पेड कार्ड सेवा देखील सुरू करणार आहे.ही प्री-पेड कार्ड्स रोखीच्या व्यवहारास पर्याय ठरणार आहेत.
म्हणजे जर तुमच्या गाडीवर फास्टॅग नसेल तर आपण टोल नाक्यावर असलेल्या पॉईंट-ऑफ-सेल्स (PoS) कडून हे प्री-पेड कार्ड खरेदी करू शकता आणि फास्टॅग ऐवजी हे कार्ड वापरल्यास टोल दुप्पट भरण्याची वेळ येणार नाही , तसेच आपले FASTag ब्लॅकलिस्ट झाले किंवा फेल झाले ,तरी देखील आपण या प्री पेड कार्डवरून टोल भरू शकाल.
1 जानेवारी, 2021 पासून FASTag बंधनकारक असेल हि माहिती , आणि या नव्या सुविधेबद्दलची माहिती , सर्व वाहन चालकांसाठी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button