मोठा वाघोद्याच्या तरुणांनी रस्ताच्या काँर्नर वरील झुडपे गवत काढले. कमलाकर माळीसह तरुणांचा पुढाकार
मुबारक तडवी मोठा वाघोदा
मोठा वाघोदा : बुरहानपूर अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील चिनावल फाट्यावरील काँर्नरवर मोठे मोठे झुटपे पालापाचोळा रस्त्यावर येत होते.तिकडून येणारे वाहने या झुडपाच्या आडोशाने दिसत नव्हती.अशाने अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नव्हती.गावातील काही व चिनावल येथील तरुणांनी वाघोदा येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर माळी यांच्याकडे या वाढलेल्या झुडपांची तक्रार केली.त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता कमलाकर माळी यांनी गावातील काही तरुणांना सोबत घेऊन लगेच ते स्थळ गाठले व आपल्या कामाला सुरुवात केली. झाडे-झुडपे काढल्याने रस्ता चांगला मोकळा झाला.त्यावेळी गावातील सोनू चिंचोले.धनराज महाजन .सत्यम पाटील .अक्षय हटकर .स्वरूप पाटील.गौरव पवार .ओम पाटील.यांनी सहकार्य केले .त्यामुळे गावातून सर्वांचे कौतुक होत आहे






