सावधान ! अजून कोरोना गेला नाही – – सावधान!मास्क न लावणार्यांवर दंडात्मक कारवाई करावी लागेल:
मुख्याधिकारी सौरभ जोशी.
युसूफ शाह सावदा ता.रावेर जिल्हा जळगाव
Jalgaon : शहरातून कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. कोरोनाशी लढा देताना हलगर्जीपणाणभ नको. नागरिकांनी अधिक सतर्क राहून कोविड संदर्भातील दिशानिर्देशाचे पालन करणे गरजेचे आहे. परंतु अजूनही अनेक जण मास्कचे पालन करीत नाहीत. सोशल डिस्टन्स चे पालन केले नाही. असा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. अन्यथा सावदा शहरातील मास्क न लावणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येइल. असा इशारा मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दिला आहे.
जिल्ह्यातल्या अनेक ग्रामीण भागात मास्क न लावणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून अनेक ठिकाणी कारवाई केली जात असून दंड वसूल करण्यात येत आहे. आपल्यावर दंडाची कारवाई टाळण्यासाठी सर्वांनी मास्क लावून वापर करावा. अन्यथा यापुढे शहरात सुध्दा पालिकेतर्फे एक पथक नेमुन मास्क लावून न फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.






