Faijpur

पुरस्कारामुळे व्यक्‍तीचा काम करण्याचा उत्साह वाढतो ..शालिग्राम भिरूड

पुरस्कारामुळे व्यक्‍तीचा काम करण्याचा उत्साह वाढतो ..शालिग्राम भिरूड

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

Faizpur : फैजपूर ता यावल वार्ताहर- पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील असो आणि कोणत्याही व्यक्तीला मिळो, पुरस्कार मिळाल्यामुळे संबंधित व्यक्तीचा काम करण्याचा उत्साह वाढतो आणि तो आपले कार्य अधिक जोमाने करू लागतो. एवढेच नाही तर त्याला जबाबदारीचे भान ठेवून कार्य करावे लागते असे प्रतिपादन जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी चे अध्यक्ष शालिग्राम भिरूड यांनी केले.
रोटरी क्लब जळगाव तर्फे यावल तालुक्यातील चार शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड देण्यात आले . त्याप्रसंगी एका छोटेखानी कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगावच्या ग स सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक तुकाराम बोरोले, जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष एन ओ चौधरी, सचिव अरुण सपकाळे, पूर्व विभाग जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर रांची पतपेढी मर्यादित भुसावळचे चे अध्यक्ष एल आर सुपे, माजी अध्यक्ष व संचालक डी ए पाटील, माजी अध्यक्ष नितिन महाजन, यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी, संजीव नेमाडे, दीपक चौधरी ,चारुलता फालक, पंकज वानखेडे ,एस एस महाजन उपस्थित होते. चारही पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार शाल व बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

पुरस्कारप्राप्त शिक्षक पुढील प्रमाणे – विकास ओंकार चौधरी व अश्विनी अरुण कोळी – भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय न्हावी, के जी चौधरी – माध्यमिक विद्यालय वड्री, ललित कुमार नीलकंठ फिरके – डी एस हायस्कूल भुसावल
पुरस्कारार्थी मधून के जी चौधरी यांनी मनोगतातून सर्वांचे आभार मानले आणि ऋण व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ललित सुपे यांनी मानले.

फोटो
सत्कारार्थी समवेत शालिग्राम भिरूड, तुकाराम बोरोले , एन ओ चौधरी, अरुण सपकाळे, डी ए पाटील ,जयंत चौधरी , ललित सुपे, नितीन महाजन

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button