Mumbai

Big Breakinig! राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला

? Big Breakinig! राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला

मुंबई

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात 31 डिसेंबर 2020 पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाऊन 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आला असल्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. यासंदर्भात आदेश ठाकरे सरकारकडून शुक्रवारी जारी केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात 31 डिसेंबर 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

राज्यभरातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे. दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग वेगाने झपाट्याने वाढत आहे. दरम्यान मिशन बिगिनच्या अंतर्गत लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत. यामुळे संसर्गाने पुन्हा फैलावत आहे. यामुळे 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल तर त्यासाठी आता केंद्र सरकारची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. यासंदर्भातील सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी जारी केल्या होत्या. केंद्राकडून नव्या मार्गदर्शक सूचना अर्थात गाईडलाइन्सही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्राची परवानगी घेणे आश्यक आहे. कोरोना कंन्टेन्मेंट झोन अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांनाच संमती द्यावी असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार असल्याची माहिती यातून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत असल्यामुळे ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दिवाळी सणामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर वाढला. यामुळे संसर्गाने पुन्हा फैलाव सुरू केला आहे. दरम्यान, नुकताच ठाकरे सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

दरम्यान राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्सला अनुसरून वेळोवेळी त्यात बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या आहेत त्या यापुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.
राज्यात टप्प्याटप्याने लॉक डावूनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. याबाबत ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यातच दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच १६ नोव्हेंबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे. या सर्व सवलती यापुढेही कायम राहणार आहेत. त्यासोबत कोविड 19 चे नियम पाळण्याचे बंधन आहे. ३१ डिसेंबरपर्यंत यात कोणताही बदल होणार नसून तेव्हाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे २०२० या वर्षात लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याची आशा आता मावळली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आहे धोका

दिल्ली व देशातील अन्य प्रमुख शहरात करोनाचा पुन्हा एकदा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यात महाराष्ट्रातही करोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारकडून वेळीच खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत. दिवाळीनंतर करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे लक्षात घेऊन तातडीने काही निर्णय घेण्यात आले आहेत. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या चार राज्यांतून महाराष्ट्रात विमान आणि रेल्वेमार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. करोना निगेटिव्ह असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जात आहे. विमानतळावरही सशुल्क करोना चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे धार्मिक स्थळे खुली करताना तिथेही कठोर नियमावली ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबतही अगदी सावध निर्णय सरकारने घेतला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button