Mumbai

? Breaking News…मुंबई विमानतळावरून सहा कोटीचे कोकेन जप्त.! एका परदेशी महिलेला अटक

बिग ब्रेकिंग न्युज
मुंबई विमानतळावरून सहा कोटीचे कोकेन जप्त एका परदेशी महिलेला अटक

मुंबई : मुंबई विमातळावर महसुल गुप्तवार्ता संचलनालयाने ( DRI )कारवाई करून एक किलो कोकेनसह एका परदेशी महिलेला अटक केली. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत तब्बल सहा कोटी रुपये आहे.
डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. त्यात एलेना कसाकातिरा या 43 वर्षीय परेदशी महिलेला अटक करण्यात आली. आरोपी महिला पूर्व आफ्रिकेतील मालवीची नागरीक आहे. ती अदिस अबाबा विमातळावरून दुबईमार्गे मुंबईत दाखल झाली होती.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमातळवर सोमवारी ती आल्यानंतर तिला थांबवण्यात आले. तिच्याकडील ट्रॉलीमध्ये ड्रग्स असल्याची गुप्त माहिती केंद्रीय यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार तपासणीत ट्रॉलीमधील गुप्त जागेत दोन पाकीटे सापडली.
कार्बन पेपरमध्येही पाकिटे लपवण्यात आली होती. त्यातील प्रत्येक पाकिटात अर्धाकिलो कोकेन सापडले. या महिलेकडून एकूण एक किलो कोकेन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत तब्बल सहा कोटी रुपये इतकी आहे. सदर महिलेकडून एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत कोकेन जप्त करण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले. त्यानंतर या महिलेला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने तिला 7 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पूर्वी अंगावर बांधून ड्रग्सची तस्करी व्हायची, आता साहित्यांमध्ये लवपून ड्रग्स आणण्याचे प्रमाण वाढले आहे. आठवड्याभरात दुसऱ्या कारवाईत विमातळावरून कोकेन जप्त करण्यात आले आहे. यापूर्वी अर्धाकिलो कोकेन तस्करीप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली होती. पार्टी ड्रग्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोकेनचे सेवन करणारे उच्चभ्रू ग्राहक असतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button