Mumbai

?️ Big Breaking..तुम्ही पोलीस खात्यावर धब्बा ;भाजपची शिकवलेली मैना कंगनाचा आयपीएस अधिकाऱ्यांशी पंगा..

?️ तुम्ही पोलीस खात्यावर धब्बा ; कंगना चा आयपीएस अधिकाऱ्यांशी पंगा

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना गेल्या महिन्याभरापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूड आणि मुंबई पोलिसांची बदनामी करत आहे.
अश्यातच आता कंगनाने थेट महिला आयपीएस अधिकाऱ्याशी पंगा घेतला आहे. कंगनाने ट्विट करत आयपीएस रुपा मुदगल यांच्यावर टीका केली आहे. ‘रुपा मुदगल पोलीस खात्यावरचा धब्बा आहे’. असं कंगनाने म्हंटलं आहे.

14 नोव्हेंबर रुपा यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये फटाके हे भारतीय परंपरेचा भाग नसल्याचं म्हटलं आहे. याचा उल्लेख कोणत्या ग्रंथात केलेला नाही. या ट्विटमुळे सोशल मीडियावर खूप चर्चा झाली.
त्यावर कंगना राणावत म्हणाली कि, ‘रुपा मुदगलयांचा हा डाव कदापि पूर्ण होऊ देणार नाही, तुम्ही पोलीस खात्यावरचा धब्बा आहे’असं ट्विट कंगनाने केलं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button