आंबेगाव

तिरपाड येथे आद्यक्रांतीवर राघोजी भांगरे व महामानव भगवान बिरसा मुंडा संयुक्त जयंती उत्साहात

तिरपाड येथे आद्यक्रांतीवर राघोजी भांगरे व महामानव भगवान बिरसा मुंडा संयुक्त जयंती उत्साहात

दिलीप आंबवणे आंबेगाव

आंबेगाव : तिरपाड ( ता.आंबेगाव ) येथे आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे व महामानव भगवान बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. प्रथम पुजन करून पुष्पहार अर्पण केला.
बिरसा क्रांती दलाचे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे म्हणाले, आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे हे अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यातील देवगाव चे होते. पण सावकारांच्या विरोधात त्यांनी बंड पुकारला त्या बंडाचे निशाण सावकारांनी आदिवासी लोकांना दिलेला त्रास कायमचा संपवणे होता. क्रांतीवर राघोजी भांगरे सोबत लुमाजी गेंगजे, भागोजी येंदे, रामा असवले, राघु गवारी, कोंड्या नवले, सतू मराडे, रामा किरवे असे अनेक साथीदार बंडात सावकरांच्या विरोध्दात काम करत होते. पण आता तरूणांनी पहिले स्वत:च्या पायावर उभे रहावून मग समाज कार्य केल पाहिजे. आदिवासी बांधवांनी हिरडा खरेदी सुरू करण्यासाठी आता आंदोलन केल पाहिजे. हिरड्या सोसायट्या दोन वर्ष बंद आहेत आंदोलन केल तर कुठ सरकारला जाग येईल. आदिवासी बांधवांनी हिरड्या दोनशे रूपये बाजार असतांना बरेच लोकांनी हिरडा घातला नाही व्यापारी लोक आता कमी भावाने हिरडा खरेदी करत आहेत त्यामुळे आता लोकांनी हिरडाला बाजार १८० रू असो किंवा १७० रू असेल त्या दरांने पैसे हाताला लावून घेऊन दिवाळी गोड करायला पाहिजे होती पण काही लोकांनी विचारले तर म्हणे हिरड्याला काय किडा लागतो काय पडू द्या घरात. पण आता हे विचार बदलले पाहिजेत. व पैसे हाताला लावून घेयाला शिकले पाहिजे. कांदा शेतकरी हे शेतातील कांदा ७ रू किलो ने विकतो मग हिरड्या जो बाजार भाव असेल त्या भावांने विकून मोकळ झाल पाहिजे आता जास्तीची अपेक्षा करणे बरोबर नाही. व पैसे हाताला लावून कुंटूबात खर्चाला तरी होतात. हे लक्षात ठेलल पाहिजे.
संदीप आंबवणे म्हणाले, आदिवासी समाजाने आता क्रांतिकारकांचे विचारांनी काम केले पाहिजे त्यासाठी समाज म्हणून एकत्र या. आदिवासी समाजावर अन्याय होत आहेत ते दूर करण्यासाठी सामाजिक ताकद उभी राहणे गरजेचे आहे आणि त्यासाठी सर्वांनी समाज म्हणून एकत्र आले पाहिजे.
दुंदा घोईरत, लक्ष्मण आंबवणे, दिपक घोईरत यांनी मनोगत व्यक्त केले.
त्यावेळी बिरसा क्रांती पुणे विभागाचे अध्यक्ष दिलीप आंबवणे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय आंबवणे, शाहीर दुंदा घोईरत, संदिप आंबवणे सर, लक्ष्मण आंबवणे सर, पोलीस पाटील दिपक घोईरत, तलाठी भाऊसाहेब धर्मा आंबवणे, काळाबाई आंबवणे, गंगुबाई आंबवणे, तुकाराम आंबवणे, नामदेव घोईरत, सचिन दांगट, दिलीप आंबवणे, राहूल आंबवणे, भरत घोईरत, किरण आंबवणे, जयराम आंबवणे, डोंगरू भोईर, मोहन आंबवणे यादी गावातील नागरीक तरूण उपस्तीत होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दुंदा घोईरत यांनी केले.

Leave a Reply

Back to top button