चांदवडला ऐन हिवाळ्यात पाणीप्रश्नी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन
उदय वायकोळ चांदवड
चांदवड : ऐन हिवाळ्यात वीस दिवसांपासून पाणी न मिळाल्याने डावखर नगर परिसरातील महिला व पुरुष यांनी आज 23 नोव्हेंबर 2020 रोजी चांदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री अभिजित कदम व चांदवड नगरपरिषद नगराध्यक्षा रेखाताई गवळी यांना पाणी प्रश्नाबाबत निवेदन दिले.निवेदनात नमूद केले आहे की ऐन सणासुदीच्या काळात 20 दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने महिलांचे खूप हाल झाले आहेत,याबाबत नगरपरिषदेस कळवून देखील कोणतीही दखल घेतलेली नाही.शहरात मुबलक पाणीसाठा असतानाही राजकीय द्वेषातून 8 दिवसाआड पाणी सोडले जाते तरी ते 2 दिवसाआड सोडले जावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.पाण्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्नाचा विचार न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे,यावेळी गोकुळ देवरे,तुषार पगार,संतोष केदारे,सोमनाथ पवार,विजया पगार,संगीता वाघ आदींसह डावखरनगरचे नागरिक उपस्थित होते






