Nashik

नाशिक येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाचा निर्णयकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्ह्यातील शाळा व कॉलेज 4 जानेवारी 2021 पर्यंत बंदच राहणार

नाशिक येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाचा निर्णयकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्ह्यातील शाळा व कॉलेज 4 जानेवारी 2021 पर्यंत बंदच राहणार

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : नाशिक येथे दिनांक 23 नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील शाळा व कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली होती मात्र त्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करणे अनिवार्य होती व ती गुरुवार शुक्रवार या तीन दिवसांमध्ये अनेक शिक्षकांनी तपासणी केली व त्यामध्ये अनेक शिक्षक कोरोना बाधित आढळून आल्याने शाळा सुरु करणे बाबत शिक्षक, पालक व जिल्हा प्रशासन यामध्ये नेमका काय करावे अ शी द्विधा स्थिती निर्माण झाली होती.
मात्र पालक संघटना व शिक्षक संघटना यांच्या आग्रही भूमिकेनंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीत नाशिकचे पालकमंत्री माननीय नामदार छगन भुजबळ जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे आधिपत्याखाली प्रशासनातील जबाबदार अधिकारी व शिक्षक संघटना प्रतिनिधी यांचे उपस्थितीत बैठक होऊन त्यात दिनांक 4 जानेवारी 2021 पर्यंत बंदच राहणार असून पहिली ते आठवी प्रमाणे नववी ते बारावी चे वर्ग सुद्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाने शिक्षक व पालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button