राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त दिपाली गृप्स तर्फे पत्रकार बांधवांचा सन्मान
प्रतिनिधी : डॉ मोहन साळुंके फैजपूर तालुका यावल
फैजपूर : राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त खान्देश नारीशक्ती गृप तर्फे दिपाली गृप्स कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन व दिपावली निमित्त काल पत्रकार बांधवांचा स्नेहमेळावा आयोजित करुन सन्मान करण्यात आला.यावेळी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या तर्फे सर्व पत्रकार बांधवांना फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले.
त्याचप्रमाणे काल भाऊबीज देखील असल्याने सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी दिव्यांग बांधवांचे औक्षण करून दिव्यांग बांधवांसोबत भाऊबीज साजरी केली.यामुळे नक्कीच एक चांगला आदर्श निर्माण होईल असे मत पत्रकार प्रा.ललितकुमार फिरके यांनी व्यक्त केले.पत्रकारांनी सामाजिक भान ठेवून पत्रकारिता केली पाहिजे जेणेकरून उपेक्षीत घटकांवर अन्याय होणार नाही असे प्रतिपादन पत्रकार प्रा.उमाकांत पाटील सर यांनी व्यक्त केले.दिपाली गृप्सतर्फे राबविण्यात येणारे उपक्रम इतर सामाजिक संस्थांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत, पत्रकार नेहमीच चांगल्या समाजपयोगी उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचं काम करत असतात असे प्रतिपादन पत्रकार प्रा.डॉ.राजेंद्र तायडे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे,देवेंद्र झोपे सर,पत्रकार संस्था अध्यक्ष व इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जिल्हाध्यक्ष फारुक शेख, पत्रकार प्रा.उमाकांत पाटील सर, पत्रकार प्रा.डॉ.राजेंद्र तायडे सर, पत्रकार प्रा.ललीतकुमार फिरके सर, पत्रकार सलीम पिंजारी, पत्रकार मुदस्सर नजर, पत्रकार इदु पिंजारी,अजय महाजन,बंटी भाऊ आंबेकर,दिव्यांग सेना शहर अध्यक्ष नितीन महाजन,सचिव योगेश (मुन्ना) चौधरी,सदस्य राहुल कोल्हे,कृषी पदवीधर युवा शक्ती ता.अध्यक्ष अक्षय धांडे,लोणार सरोवर अपंग संस्था अध्यक्ष एहसान कुरेशी, इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष संदिप पाटील,ह.भ.प.रेवा बाबा चौधरी इ.उपस्थित होते.






