Rawer

सावदा सपोनि वाघांचा गुन्हेगारांवरील दरारा वचक, जातिय सलोखा श्री.इंगोले अबाधित राखणार का??
श्री.राहुल वाघ सिंघम ठरलेत श्री.इगोले राऊडी राठौड बनतील का??

सावदा सपोनि वाघांचा गुन्हेगारांवरील दरारा वचक, जातिय सलोखा श्री.इंगोले अबाधित राखणार का??
श्री.राहुल वाघ सिंघम ठरलेत श्री.इगोले राऊडी राठौड बनतील का??


प्रतिनिधी : मुबारक तडवी रावेर


रावेर : सावदा पोलिस स्टेशन हद्दीतील गावांतील अवैध धंदेवाईक, घरफोडी,रस्तालुटी चोर सराईत गुन्हेगारांवर तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक श्री.राहुल वाघ यांनी आपला खाकीचा दबदबा वचक,दरारा निर्माण करीत गुन्हेगारी पार्श्वभूमी मोडीत काढून असलेल्यांवर पोलिस प्रशासनाचा दबदबा निर्माण केलेला होता तसेच कर्तव्य कार्यकाळात त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक सलोखा ही अबाधित राखला व जातियवादी समाज कंटकांच्या दृष्ट मनसुबे उधळून लावत सर्वधर्म समभाव सामाजिक एकात्मता,व जातिय एकात्मता ,कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून जातिय सलोखा निर्माण केला होता दांडगा जनसंपर्क, मनमिळावू स्वभावा संत्र्याची खंबीरपणे साथ देत त्यांनी पोलिस प्रशासनाची प्रतिमा पोलिसांतील देवमाणूस प्रमाणे निर्माण केली भलामोठा मित्रपरिवार, दांडगा जनसंपर्क व बुद्धी कौशल्याने त्यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांना यश आले मग ते रस्तालुट , मोटारसायकल चोर दारूचोरी विक्री,खुनप्रकरण, अवैध धंदेवाईक गटातटाचची भांडणे , भ्रष्टाचारी,या सर्वांवर सपोनि वाघांचा वचकव दरारा होता सावदा पोलिस स्टेशन मधील त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची नाशिक ग्रामीण पोलिस स्टेशनला बदली झाली असून त्याच्या जागी नाशिक येथील भद्रकाली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.देविदास इंगोले यांनी नुकताच सावदा पोलिस ठाण्यात रुजू झाले असून पदभार स्वीकारला आहे नव्यानेच रुजू झालेले तसेच नाशिक भद्रकाली पोलिस ठाण्यात उत्कृष्ठ सेवा बजाविलेले गुन्हेगारी चां बिमोड करीत नुकतीच बदली होऊन सपोनि देविदास इंगोले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सपोनि डी.डी. इंगोले यांना सावदा पोलिस स्थानकातील सपोनि राहुल वाघ यांच्या कार्य कर्तव्याप्रमाणेच गुन्हेगार, अवैध धंदेवाईक सराईत गुन्हेगारांवर वचक दरारा कायम राहील तसेच सर्वधर्मीय सर्वधर्म समभाव सामाजिक बांधिलकी जातिय सलोखा एकात्मता कायदा सुव्यवस्था अबाधित व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी वजा विनंती सावदा पोलिस स्टेशन हद्दीतील गावांतील नागरिकांतून व्यक्त केली जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button