Faijpur

धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे मौलाना अब्दुल कलाम आजाद यांची जयंती उत्साहात साजरी

धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे मौलाना अब्दुल कलाम आजाद यांची जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी : सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महान स्वातंत्र्य सेनानी तसेच शिक्षण तज्ञ व भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी अध्यक्ष म्हणून मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जीवनावर व कार्यावर गुणगौरवपर भाषण केले. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ ए आय भंगाळे यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी व विद्यार्थी विकास विभागाचे सहाय्यक अधिकारी डॉ नितीन चौधरी उपस्थित होते. तसेच प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button