भीमआर्मी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात ७ नोव्हेंबर “विद्यार्थी दिवस” साजरा….
प्रमुख मा. नेहाताई शिंदे यांचा जबरदस्त उपक्रम
प्रतिनिधी : लक्ष्मण कांबळे
मुंबई : काल दि. ७ नोव्हेंबर रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम शालेय प्रवेश दिनानिमित्त संपुर्ण राज्यात हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. कोवीड-लाॅकडउनमु़ळे शाळा बंद असल्याने भीमआर्मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नेहाताई शिंदे यांनी आपल्या प्रदेश कार्यालय कळंबोली जिल्हा रायगड या ठिकाणी भीमआर्मी, आरीन फाऊंडेशन व लोकसेवा शिक्षण संस्था यांच्या संयोजाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप केले. या प्रसंगी मीस इंडिया फायनालिस्ट मीस धृवी, उत्तरा, व रश्मी यांनी मुलांच्या आनंदात सहभागी होऊन मुलांना केक, चाॅकलेट, मास्क सॅनिटाइजर चे वाटप करून आजच्या दिवसाचे औचित्य साधले. व मुलांना सांगीतले की त्यांना मीस इंडिया सारख्या स्पर्धेत भाग घेण्याचा अधिकार फक्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधामामुळेच मिळाला. सदर कार्यक्रमात भीमआर्मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नेहाताई शिंदे, लोकसेवा शिक्षण संस्थेच्या संचालिका हेमलता गायकवाड व डाॅ. शरद देशमुख यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी केलेला संघर्ष व शिक्षणाचे महत्व यावर विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. या प्रसंगी मान्यवर नितेश मिसाळ, हेमलता गायकवाड, डाॅ. शरद देशमुख, अरूण देसाई, सुर्यवंशी, नागेश खंडागळे, वंदना बामणे, सुदेश शिंदे सर व भीमआर्मी चे कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






