Rawer

आदिवासींवर होत असलेल्या अत्याचार रोखण्यासाठी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची निवेदनाद्वारे नशिक विभागीय आयुक्तांकडे मागणी

आदिवासींवर होत असलेल्या अत्याचार रोखण्यासाठी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची निवेदनाद्वारे नशिक विभागीय आयुक्तांकडे मागणी..

प्रतिनिधी : मुबारक तडवी



रावेर : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील हत्याकांडा च्या पाठोपाठ सारंगखेडा ता. शहादा येथील आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचात करून निर्घृण खून झाल्या ने समस्त आदिवासी समाज हादरला असुन आदिवासी समाजाच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे असून कायदा सुव्यवस्था वर देखील शंका येवू लागली आहे.
त्यामूळे ही परिस्थितीची जाणीव नासिक विभागाच्या विभागीय आयुक्तांना आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. राजू तडवी यांनी करून देत लवकरात लवकर होत असलेले अन्याय रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आदिवासींना भयमुक्त करावे अशी मागणी करण्यात आली.ज्यामुळे भविष्यात आदिवासी समाजावर आणि अन्य घटकांवर कोणताही अन्याय होणार नाही.
तसेच मौजे सारंगखेडा ता.शहादा जि.नंदुरबार येथील पीडितेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून अनुसूचित जाती व जमाती दंड संहिता व खुनाचा गुन्हा नुसार नराधमास फाशी शिक्षा व्हावी जेणेकरून यानंतर कोणी आदिवासी समाजाच्या मुलीवर किंवा स्त्रियांवर वाकडी नजर करून पाहणार नाही.
या सर्व घटनांचे गांभीर्य लक्षात घेता सारंगखेडा ता. शिंदखेडा अल्पवयीन पीडितेचा आरोपी आणि रावेर येथील आरोपींसह सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी सदरील खटला जलद न्याय कोर्टात दाखल करण्यात यावा अशी मागणी व विनंती देखील करण्यात आली आहे… प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि फाशीच्या शिक्षा न झाल्यास अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद द्वारा राज्यभर तिव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

निवेदन देतेवेळी परिषदेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री राजु तडवी, जळगांव जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष श्री. रौनक तडवी, रावेर तालुकाध्यक्ष श्री. मेहमूद तडवी आणि आदी समाज बांधव उपस्थित होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button