बोरी नदी कचरा आणि घाणीच्या विळख्यात…. अमळनेर नगरपरीषदेच्या “अस्वच्छ कारभाराचा “आणखी एक प्रत्यय …..
अमळनेर शहरातील बोरी नदी ही अमळनेरकरांसाठी सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेचे ठिकाण आहे. या नदीच्या पात्रात अमळनेर नगरपरिषदेकडून कचरा फेकला जात आहे तसेच कचऱ्याचे ढीग पात्रात दिसून येत आहेत. पावसाळा जवळ आला असून नदीतील ही घाण ,कचरा पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करणे आवश्यक आहे.नदी परिसरात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
विविध ठिकाणाहून येणारे प्रवासी बोरी नदी पात्रातील पुलावरून येत-जात असतात पर्यायाने अमळनेर शहराची सांस्कृतिक आणि धार्मिक धरोहर असलेली नदी पाहून त्यांचाही अपेक्षाभंग होत असून अमळनेर नगरपरीदेच्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या कार्यक्षम प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन नदी पात्र स्वच्छ करून बोरी नदीला मोकळा श्वास घेऊ दयावा अन्यथा नागरिक स्वतः हातात फावडे, तगाऱ्या घेऊन नदी पात्र साफ करतील याची नोंद घ्यावी.









