बोहरा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीस मान्यता दिल्याने आ शिरीष चौधरींनी मानले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभार
जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल केले अभिनंदन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पावर आधारित बोहरा येथील साने गुरुजी सहकारी उपसा सिंचन योजनेच्या प्रायोगिक तत्वावर पुनस्थापना व दुरुस्तीच्या 11.49 कोटी/रु किमंतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आ शिरीष चौधरी यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे आभार व्यक्त केले.
तसेच ना महाजन यांची जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार आ चौधरी यांनी केला.दरम्यान मुंबई येथे पार पडलेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत बोहरा सिंचन योजनेच्या दुरुस्तीस मान्यता देण्यात आल्याने आ.चौधरी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की,या मान्यतेसाठी आपण 2016 पासून सतत पाठपुरावा केला होता,जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन तसेच जलसाठा आणि जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री ना विजय शिवतारे यांना वेळोवेळी निवेदने देऊन दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली,सदर मागणीची दखल घेत ना शिवतारे यांनी मुंबई येथे मंत्रालयातील त्यांच्या दालनात संबधित विभागाची बैठक बोलावून या बैठकीत ना शिवतारे यानीं दुरुस्तीसाठी त्वरित निधी उपलब्द करण्याचे आदेश दिले होते.यानंतर देखील आपण ना महाजन यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने त्याचेच फलित म्हणून या योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असून यामुळे आपल्या मतदार संघातील मोठा प्रश्न सुटला असल्याचे आ चौधरी यांनी सांगितले.ना महाजन यांचा सत्कार करताना आमदारांसोबत नगरसेवक धनंजय महाजन व शामकांत पाटील उपस्थित होते.







