स्वच्छता पुरस्कार प्राप्त अमळनेर नगरपरिषदेची कमाल धमाल कामगिरी बोरी नदी पात्रालाच केले डम्पिंग ग्राउंड.…..
अमळनेर नागरपरीदेच्या “अस्वच्छ”अमळनेर चा आणखी एक प्रत्यय ….
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर नागरपरिषदेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आहे अश्या नगरपरिषद हद्दीतील खारटेश्वर मंदिर मागच्या बाजूला नागरिकांच्या तक्रारी नुसार भेट दिली असता अमळनेर नगरपरिषदेने बोरी नदी पात्रा लाच डम्पिंग ग्राउंड बनविल्या निदर्शनास आले. या भागात मोठ्या प्रमाणात कचरा,नाला,गटार सफाई केलेले शहरातील सर्व घाण टाकलेली आढळून आली .याशिवाय एक म्हैस दोन ते तीन दिवसांपासून नदी पात्रात मेलेली आढळून आली.नागरिकांनी तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही .विशेष म्हणजे उपनगराध्यक्ष याच भागातील असून त्यानीही या गोष्टी कडे दुर्लक्ष केले आहे.संपुर्ण किनाऱ्याच्या भागात घाणीचे साम्राज्य असून नागरिक घाण,अस्वच्छता, दुर्गंधी या प्रकारांना कंटाळून गेले आहेत.या परिसरात ठीकठिकाणी गटार काढल्यानन्तर चे ढीग पडले असून त्यात मस्त पैकी वराह कुटुंब एन्जॉय करत आहेत. ते ढिगारे उचलण्यात आलेले नाहीत.
स्वच्छतेचा पुरस्कार नेमका कोणत्या निकषांवर मिळाला हा या सर्व प्रकारांनंतर संशोधनाचा विषय आहे.









