Maharashtra

धनाजी नाना महाविद्यालयात संत कबीर व लोकसेवक मधुकरराव चौधरी यांची जयंती साजरी

धनाजी नाना महाविद्यालयात संत कबीर व लोकसेवक मधुकरराव चौधरी यांची जयंती साजरी 

धनाजी नाना महाविद्यालयात संत कबीर व लोकसेवक मधुकरराव चौधरी यांची जयंती साजरी


दि.१७ जून २०१९ रोजी ग्रंथालय विभाग व सन महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रथालयात करण्यात आले.

प्रास्तविक -ग्रंथपाल आय.जी .गायकवाड यांनी केले .संत कबिर यांचे जीवन व कार्याची ओळख हिंदी विभाग प्रमुख डाॕ.कल्पना पाटील यांनी करून दिली.कबिरांचे दोहे आजही जनमानसांच्या जीवनासाठी कसे प्रेरणादायी आहेत हे विविध उदाहरणे देऊन प्रभावी पणे श्रोत्यांना पटवून दिले 

लोकसेवक बाळासाहेब  मधूकरराव चौधरी यांचे  शैक्षणिक कार्य व एक आदर्श गांधीवादी नेते होते  त्यांनी २९ वर्षे रावेर यावल मतदारसंघाची निस्वार्थ सेवा  केली याबद्दल आढावा अध्यक्षिय समारोप करताना उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे यांनी मांडले .

आभार प्रदर्शन ग्रंथपाल सहाय्यक व्ही.एस सिसोदे यांनी मानले सूत्रसंचालन -श्रीमती यमू नेमाडे यांनी केले .सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व ग्रंथालयातील कर्मचारी व सन महोत्सव समिती प्रमुख डाॅ .आय .पी .ठाकुर व सदस्य डाॅ .दीपक सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button