सरस्वती विद्या मंदिर शाळेत ‘विश्व योग दिवस’ विविध योगासन करून साजरा
अमळनेर प्रतिनिधी
येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत ‘विश्व योग दिवस’ विविध योगासन करून साजरा करण्यात आला.” एककेंद्री शांत मन, निरोगी,उत्साही व दिर्घ आयुष्यासाठी नियमित योगा लाभदायक आहे!”असे याप्रसंगी मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना योगा चे दैनंदिन आयुष्यातील महत्व समजून देत मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी यावेळी योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनीही पद्मासन, वज्रासन,ताडासन,वृक्षासन, नौकासन,पवनमुक्तासन,सूर्यनमस्कार,हस्त पादासन, हलासन,मत्सासन,हस्तपादा सन,अर्धचक्रासन आदिसह विविध आसन यावेळी केलीत. याप्रसंगी प्राणायाम चे ही प्रकार विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले.यावेळी उपस्थित शिक्षक शिक्षिकानीही योगासने करून सहभाग घेतला. योग दिवसाच्या यशस्वीतेसाठी धर्मा धनगर,ऋषिकेश महाळपूरकर,आनंदा पाटील, संगिता पाटील, गीतांजली पाटील, परशुराम गांगुर्डे,मदतनीस संध्या ढबू आदिंनी प्रयत्न केले.








