अमळनेर मतदार संघातील प्रत्येकात हिरे,ते शोधण्याची गरज-आ शिरीष चौधरी
आमदार शिरीषदादा मित्र परिवार तर्फे महागुणगौरव सोहळा उत्साहात, सुमारे 1500 गुणवंत आणि विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांचा गौरव
अमळनेर
या मतदार संघात प्रत्येकात हिरे दडलेले असून प्रत्येकाने ते आपल्यात शोधण्याची गरज आहे,कुणाचेही टॅलेंट कुणी घेऊ शकत नाही,आमच्या परिवाराचे आद्य कर्तव्य समजून या भूमीतील गुणवंत प्रज्ञावंतांचा गौरव आम्ही करीत असल्याची भावना आ शिरीष चौधरीं यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आ.शिरीषदादा चौधरी मित्र परिवारा आघाडीने आयोजित केलेल्या सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,आणि क्रीडा क्षेत्रातील 1500 प्रतिभावंतांच्या महा गुणगौरव समारंभात व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ.रविंद्र चौधरी हे होते.
विशेष म्हणजे यावेळी आ.चौधरींचे सुपुत्र चि.प्रथमेश यानेही कार्यक्रमात उपस्थिती देऊन आगामी काळात युवकांसाठी भरीव कार्य करण्याची भावना व्यासपीठावरून बोलून दाखविली,यामुळे विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्यांनी दाद दिली.’सर्वांगिण विकासासोबत अमळनेरच्या कर्तृत्वान व्यक्ती, संस्था व गुणी विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे आ.शिरीष चौधरी हे मतदारसंघाला खऱ्या अर्थाने न्याय देत आहेत!मुलांना गुणवंत करण्यासारखा दुसरा आनंद नाही’ अशी भावना यावेळी मा.कुलगुरु प्रा.शिवाजीराव पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केली.तर अमळनेर च्या गुणी विद्यार्थ्यांच्या सत्कारासह त्यांच्या भविष्यातील वाटचालीतही आ.शिरिषदादा चौधरी मित्र परिवार,हिरा उद्योग समूह सहभागी राहिल! असे जाहिर आश्वासन अध्यक्षीय भाषणात डॉ.रविंद्र चौधरी यांनी दिले.तसेच सेल्फ कॉन्फिडन्स प्रत्येकात असतो तो हायलाईट करा,आ शिरीष चौधरी हे विकास कामात अव्वल ठरत असताना आमची भगिनी रेखा चौधरी हि झेप फाऊंडेशनच्या माध्यमातून बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्याचे कार्य करीत आहे,आता कॉम्प्युटर युग नसून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी चे युग आहे,यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमासोबत यालाही प्राधान्य द्या असा मौलिक सल्ला विद्यार्थी व युवकांना देत आ चौधरींच्या मागे पाठबळ उभे करण्याची विनंती केली.तर आ चौधरी यांनी पुढे बोलताना लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुतगीरणीचे भूमिपूजन करून युवकांना रोजगाराची द्वारे खुली करण्याचे शुभसंकेत दिले.
सुरवातीला प्रास्तविक मनोहर महाजन यांनी केले.दीपप्रज्वलनाने महा गुणगौरव सोहळ्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संपूर्ण नाट्यगृह हाऊसफुल्ल झालेले होते,अमळनेर मतदारसंघातील पी एच डी प्राप्त प्राध्यापक,NIIT तिल यशस्वी विद्यार्थी,10 वी 12 वी तील यशस्वी गुणवंत, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, ग्रामिण भागात पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून जलसंधारण कार्य करणारे गावं, कार्यकर्ते, पर्यावरण संवर्धन ,वृक्षारोपण करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकारी , दुष्काळात जनावरांसाठी कार्यरत गो शाळा,क्रिडा क्षेत्रातील पुरस्कारार्थी ,स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण गुणवंत,साहित्य व संस्कृती क्षेत्रातील मान्यवर अश्या सुमारे 1500 प्रज्ञावंतांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.यावेळी मुंदडा फाऊंडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा, प्रथमेश शिरीष चौधरी यांचेसह सत्कारार्थी नगाव येथिल कार्यकर्त्या सौ. प्रेरणा बोरसे,वक्ता सारांश सोनार, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील , सामाजिक व राजकीय महिला कार्यकर्त्या सौ.सुलोचना वाघ यांनीही आपल्या मनोगतात आ.शिरीष चौधरी व त्यांच्या मित्र परिवाराच्या कार्याचे कौतुक केले.याप्रसंगी मंचावर सौ अनिता चौधरी,अर्बन बँक चेअरमन पंकज मुंदडे ,खान्देश शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष प्रदिप अग्रवाल,पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी, ग.स.बँक उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे,शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील,अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, श्याम गोकलानी, डॉ रवींद्र जैन,प्रशांत सिंघवी,प्रकाश मुंदडे, अमय मुंदडे, संदीप घोरपडे,मधुकर पाटील, दिलीप सोनवणे, श्यामकांत भदाणे, गंगाराम महाजन, मिलिंद डेरे, ऍड किशोर बागुल, बिपीन कोठारी,जैन ओसवाल समाजाचे अध्यक्ष प्रकाशचंद पारख, दर्शना पवार,सुलोचना वाघ,प्रा जयश्री साळुखे,सुरेखा पवार, सौ माधुरी पाटील, ज्योती भोई,सुरेश पाटील,लालचंद सैनानी,डॉ चंद्रकांत पाटील,रोटरी क्लब अध्यक्ष दिनेश रेजा, विनोद जैन, हरचंद लादगे,ग्रामिण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय गाढे,सौ सुरेखा पवार,गटनेते प्रवीण पाठक, श्रीराम चौधरी,नगरसेवक नरेंद्र चौधरी, बाळासाहेब सदांनशिव,सलीम टोपी, संतोष लोहरे,पंकज चौधरी, श्याम पाटील, किरण बागुल, धनंजय महाजन, महेश जाधव, सुरेश सोनवणे, गुलाम नबी, अविनाश जाधव, मनोज शिंगाने उपस्थित होते.
कार्यक्रमास तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला आघाडीचे सदस्य, विद्यार्थी – पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन रणजित शिंदे आणि वसुंधरा लांडगे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनिल भामरे,विजयंद्र शिरसाळे,प्रा.सुभाष महाजन,महेश चौधरी, व आ शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीच्या कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.








