अमळनेर
नगरपरिषदचे मच्छी मार्केट भागात लालबागच्या पाणी पुरवठा केंद्र असून येथे अत्यंत घाण आहे .किळसवाणी घाण आणि वास याठिकाणी येत आहे.याभागात
अतिक्रमण वाढले आहे याकडेही नगरपरिषदेचे दुर्लक्ष आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे Cctv फक्त नावालाच उरलेले आहेत त्यांचा काहीही उपयोग नाही.
मच्छी मार्केट ची सगळी घाण याच ठिकाणी टाकण्यात येत आहे तसेच भाजी मार्केटची घाण याच भागात टाकली जाते आहे. पावसाळ्यात भाजीपाला सडतो तो इथेच टाकण्यात येत आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.पाणी पुरवठा अधिकारी यांनी या ठिकाणी “सोईस्करपणे” दुर्लक्ष केले आहे.की आणखी काही वेगळी “सेटिंग” आहे ते समजण्यास मार्ग नाही.
भांग, गांजा,दारुड्या लोकांचा येथे रोज राबता आहे.दिवसभर रिकामटेकडे लोक,तरुण या भागात फिरत असतात. भांग, गांजा याची अवैध देवाण घेवाण या ठिकाणी होते त्याकडेही नगरपरिषदेने सोईस्करपणे काना डोळा केला आहे.
जिथून सर्व शहराला पिण्याचे पाणी पुरविले जाते अश्या पाणी पुरवठा सारख्या ठिकाणी अशी “अस्वच्छता”आहे तर इतर ठिकाणी न बोललेले बरे ,
नगरपरिषदेचा हा कारभार म्हणजे दिव्या खाली अंधार असून इतर ठिकानांबाबत न बोलले बरे अशी अवस्था निर्माण झाली आहे.
पाणी टाकी परिसरात कुणीही येत जात राहतात त्याना कुणाचेही बंधन नाही,
अशा ठिकाणी काही दुर्दैवाने अपघात झाल्यास कोण जबाबदार राहील असा प्रश्न ही उपस्थित होत आहे.









