विद्यार्थ्यांच्या तांदूळावर शाळा संबंधितांनी मारला डल्ला सीईओ यांनी घेतली दखल :,न्याय न मिळाल्यास दिला, बेमुदत उपोषणाचा इशारा!
सावदा युसुफ शाह
शासनाच्या वतीने मार्च महिनाअखेर आलेले शालेय पोषण आहार योजनेचे तांदूळ सावदा अॅगलो उर्दू हायस्कूल या शाळेतुन थेट 12 ते 15 क्विंटल तांदूळ विक्री करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले होते. याबाबत सावदा व परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले तशी लेखी तक्रारही केली होती. याची दखल घेत आज जि. प. .सि. ई. ओ. यांनी तक्रारदारास बोलावून चौकशी केली आहे.
सदरील गंभीर व दखल पात्र गैर प्रकारा बद्दल सावदा येथील एक जागृक पालक शेख फरीद शेख नुरोद्दिन यांनी नागरिकांच्या मनातील भावना व्यक्त करून, शालेय पोषण आहार अधिक्षक पं.स.रावेर यांची समक्ष भेट घेऊन तक्रार केली. अधिकार्यांनी लॉकडाउनचा विषय पुढे करुन थेट तक्रार स्विकारण्यास मनाई केली होती . त्यानंतर ८एप्रिल आणि २० एप्रिल रोजी जि. प. पू मुख्याधिकारी सह सर्व संबंधित अधिकार्यांकडे लेखी निवेदनाद्वारे तसेच आँनलाईन तक्रार केली होती.
या तांदूळ विक्री गैर प्रकणाची तातडीने दखल घेऊन चौकशी व कारवाई केली जाईल या आशेने बीडीओ मँडम, सभापती आणि शालेय पोषण आहार अधिक्षक प. स. रावेर यांनी पुराव्यानिशी प्रकार पाहिला. तक्रारदारांच्या तक्रारी मुळे घोटाळा करणार्यांनी हताश होऊन, धक्काच घेतला होता. लगेच त्यांनी बाहेरून तांदूळाची जुळवाजुळव करून कसेबसे इतर पोत्यांमध्ये तांदूळ भरून शाळेत ठेवले गेले. याप्रकरणी तात्काळ कारवाई केली असती तर तेथे तांदूळाचा एक दाणाही आढळून आला नसता. यामुळे चोरट्यांना कोणतीही संधी मिळाली नसती. सुरवातीपासून येथील शा. पो. आ. अधिक्षक रावेर यांची बेजबाबदारी संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. तरीही आजपावेतो येथील गंभीर प्रकाराची दखल घेण्याचे गांभीर्य कोणी दाखविले नाही. आणि मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब जि. प. जळगांव, जिल्हा अधिकारी साहेब जळगांव, संचालक साहेब पुणे, मा.शिक्षण मंत्री साहेब म.रा.मुंबई यांचे कडे तक्रार केल्यानंतर दि ७ आँक्टोबर रोजी जि. प. डेप्युटी सी. ओ.रणधीवे यांनी तक्रारदाराला बोलावून माहिती जाणून घेतली. आणि कारवाईचे आश्वासन दिले आहेत. मात्र आता जर या प्रकरणी कारवाई झाली नाही तर १५ दिवसानंतर कोणत्याही क्षणी लोकशाही मार्गाने अँग्लो उर्दू हायस्कूल समोर न्याय मिळेल तो पर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा डेप्युटी सीओ रणधिवे यांचे उपस्थितित, त्यांचे समोर बी. डि. ओ. दिपाली पाटील यांना लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.
शाळेतुन विक्री करण्यात आलेले विद्यार्थ्यांचे हक्काचे तांदूळ गैर प्रकणाची चौकशी होऊन दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल व्हवा म्हणुन तक्रार द्वारे दाद मागितलेली आहे. तसेच या गैर प्रकारा बद्दल चे ठोस पुरावे असून चौकशी वेळी सादर करण्याचे तक्रारदार यांनी म्हटले आहे.
.






