Rawer

संपुर्ण भारतभर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी,एकाच दिवशी बहुजन क्रांती मोर्चा द्वारे राष्ट्रव्यापी एकदिवसीय धरना आंदोलन…

चलो रावेर..चलो रावेर

संपुर्ण भारतभर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी,एकाच दिवशी बहुजन क्रांती मोर्चा द्वारे राष्ट्रव्यापी एकदिवसीय धरना आंदोलन…

देशभराप्रमाणे रावेर तालुक्यात सुद्धा धरना प्रदर्शन

युपीमधील हाथरस येथील घटना,मनिषा वाल्मिकी नावाच्या तरुण मुलीवर मनुवादी मानसीकतेच्या गुंड प्रवृत्तीच्या ठाकुर तरूणांनी बलात्कार करून,जीभ कापुन,कमरेची हाडं मोडून मानवतेला काळीमा फासण्याचं काम केलं,भदोही,आझमगढ यासोबत संपुर्ण भारतभर बलात्काराच्या घटना वाढत आहे,खुन,घोटाळे,होत आहेत,सनई हत्याकांड,ऊणा हत्याकांड,बालाजी कांबळे हत्याकांड,मुस्लिम बांधवांवर व सर्व बहुजन समाजातील लोकांवर होणारे माॅबलिंचींगचे प्रकार, खैरलांजी हत्याकांड,गोध्रा हत्याकांड,रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड व आजपर्यंत ब्राम्हणवाद्यांकडुन घडवलेले सर्व हत्याकांड या सर्व घटनांच्या निषेधार्थ वाल्मिकी व सर्व बहुजनांचा बुलंद आवाज आहे हे धरना आंदोलन,भारतीय संविधान संपवु पाहणार्या नराधमांच्या विरोधात,पुलवामा येथील घडलेल्या हत्याकांडाच्या विरोधात,शिक्षण-आरक्षण-नौकरी संपवुन जे खाजगीकरण या देशात निर्माण होत आहे,त्या खाजगीकरणाच्या विरोधात,गैरसंवैधानिक कायदे करणार्यांच्या विरोधात, शेतकर्यांचा अहितामध्ये जे ३अध्यादेश बीजेपि सरकारने मंजुर केले,त्याविरोधात,हे सर्व घडत असतांना जो मिडीया दाखवित नाही,त्या मिडीयाच्या विरोधात,ईव्हीएमच्या विरोधात या सर्व बाबींच्या विरोधात आहे हे धरना आंदोलन,सर्व बहुजनांना व सर्व बहुजनवादी,आंबेडकरवादी संघठनांना,समविचारी संघठनांना अपिल आहे कि या धरने आंदोलनात सहभागी व्हावे हि नम्र विनंती.

दि.८.१०.२०२०,
वार:गुरुवार
वेळ:-सकाळी ११:०० ते सायं ५:००
ठिकाण :- तहसील कार्यालयासमोर,रावेर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button