येवला मुक्ती भूमी धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन सोहळा पहिल्यांदाच रद्द
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-:येवला येथील मुक्तीभुमी वर साजरा होणारा ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक धर्मातंर घोषणा, मी जरी हिंदु धर्मात जन्माला आलो पण हिंदु धर्मात मरणार नाही, ह्या ऐतिहासिक घोषणा ८५ वा वर्धापन दिन कोरोना व्हायरस महामारी च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे कोरोना ने जगात थैमान घातले असता त्याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी गर्दी करू नये अथवा होऊ नये म्हणून शासनाने अद्यापही मंदिरे , मज्जिद, विहारे उघडे करण्यासाठी परवानगी दिलेली नसताना नागपूर येथील दीक्षाभूमी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून त्या पाठोपाठ संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 मध्ये येवला मुक्ती भुमी येथे भिमगर्जना केली त्या क्रांती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येणारा भीमसैनिक मोठ्या उत्सवाने येथे नतमस्तक होण्यासाठी येत असतो परंतु यावर्षी म्हणजेच 13 ऑक्टोंबर 2020 रोजीचा अभिवादन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे त्यामुळे गर्दी होण्याचे टाळले जाईल तसेच कोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर याठिकाणी विविध छोटे-मोठे विक्रेते येऊन बाबासाहेबांच्या विचारांची पुस्तके फोटो ,फुल हार, मिठाई त्याच बरोबर कटलरी , खेळणी,मनोरंजनाची वस्तू घरगुती उपयोगी वस्तू यांचीही याठिकाणी खरेदी-विक्री ची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते परंतु यावेळी या विक्रेत्यांना मोठी झळ मोठ्या प्रमाणात सहन करावा लागणार आहे
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उसळणारा भीम सैनिक या ठिकाणी आपल्या परिवारास सह पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून स्वच्छ निर्मळ मनाने नतमस्तक होतात व सामाजिक व बाबासाहेबांच्या विचारांवर प्रबोधन कार्यक्रमाचा लाभ घेतात परंतु यावर्षी पहिल्यांदाच धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन रद्द करण्यात आला आहे येवला शहर पोलीस ठाण्यात वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोलविलेल्या बैठकीत येवला पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांनी कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आला अशी माहिती दिली आहे भारतीय बौध्द महासभा व आदरणीय मिराताई आबेङकर प्रतिष्ठान, मुक्तीभुमी प्रतिष्ठान, बार्टी सह तालुक्यातील आबेङकरी अनुयायी व विविध आबेङकरी गट यांनी धर्मातंर घोषणा वर्धापन दिन रद्द करण्यात आला आहे पोलीस प्रशासन यांनी स्पष्ट केले आहे मुक्तीभुमी येथे सालाबाद प्रमाणे शासकीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पचंशिल ध्वजारोहण व क्रांतीस्तभांस मानवंदना दिली जाणार आहे बैठकीस नायब तहसीलदार श्री राजेंद्र राऊत साहेब, येवला नगर परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणकुमार पाटील ,बार्टी च्या मुक्ती भुमी संशोधन अधिकारी पल्लवी पगारे यांच्या सह आबेङकरी चळवळीतील पक्ष संघटना पदाधिकारी उपस्थित होते






