चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल:-
चोपडा येथील शेतपुरा भागातील जयेश भास्कर बडगुजर याचे आरोपी अशपाक अरमान याचा वहिनी शी काहीतरी संबंध असल्याचा कारणावरून युवकाला बेदम मारहाण करण्यात आली .
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार दि.१४ /०७/२०१९ रोजी शेतपुरा भागातील राहणाऱ्या फिर्यादी जयेश भास्कर बडगुजर वय २४ पुणे येथील खाजगी कंपनीत काम करणाऱ्या युवकाचे आरोपी अशपाक अरमान यांचा वहिनी सोबत काहीतरी संबंध असल्याचा कारणावरून अशपाक अरमान याने आपल्या काही सहकर्यांसोबत शेतपुरा भागातील संत रोहिदास महाराज यांचे समाजमंदिर समोर दुफारी साडे तीन वाजेचां सुमारास आरोपी अशपाक अरमान, तौसिफ हमीद ,मुबारख,शेंबड्या(टोपणनाव) रा. शेतपूरा यांनी फिर्यादी जयेश भास्कर बडगुजर यास लोखंडी फावडी,तसेच लाकडी शिगाड्याने हाताला पायाला व डोक्याला जबर दुखापतीत फिर्यादीचा डावा हात फ्रॅक्चर झाला व त्याला उपचारा करता खाजगी रुग्णलयात दाखल करण्यात आले फिर्यादवरून चोपडा पोलीस स्टेशनला रात्री आठ वाजता भादवी क.३२६,५०४,५०६,३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले.
शबानाबी शेख नईम वय २८ रा. शेतपुरा यांनी दिलेल्या फिर्याद नुसार जयेश बडगुजर यांनी दि.१४/०७/२०१९रोजी साडे अकरा वाजता फिर्यादीच्या घराजवळ फिर्यादिस बोलला आप मूजे बोहत पसंत है अस बोलून तिचा उजवा हात मंनगटाजवळ धरूनओढाताण करून तीस लज्जा उत्तप्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला म्हणून आरोपी जयेश बडगुजर याचावर रात्री दहा वाजता माधवी क.३५४(ड)(१),३५४(ड)(२)गुन्हा दाखल करण्यात आला
आहे पुढील तपास सपोनी योगेश तांदळे करीत आहे.







