फैजपुर प्रतिनिधी(सलीम पिंजारी )
येथिल नगर पालिके तर्फे नाले सफाई व धूर फवारणी जोमाने सुरु असुन त्या मुळे नागरिकां मध्ये समाधान व्यक्त होत आहे येथील गेल्या काही दिवसा पासून फैजपुर शहरात सर्व गल्ली बोळा मध्ये नगर पालिकेने नाले सफाई व धूर फवारणी ची मोहीम हाती घेतली असून त्या मूळे फैजपुर शहरात साफसफाई ला आणखी भर पडत आहे गेल्या दोन वर्षा पूर्वी फैजपुर नगर पालिकेला स्वच्छ आणि सुंदर फैजपुर शहर असा पुरस्कार सुध्दा मिळालेला आहे म्हणून फैजपुर शहर सुंदर शहर अशी ओळख झाली असून येथील कर्तव्य दक्ष मुख्यधिकारी किशोर चव्हान तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा महानंदा होले व सर्व नगरसेवक नगरसेविका नगरपालिका कर्मचारी हे साफ सफाई कडे जातीने लक्ष देत असल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.







